‘एंड काउंटर’ म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना- मृण्मयी कोलवालकर


उत्तम कलाकारांसाठी कोणतीही भाषा आणि कोणतेही क्षेत्र हे वाईट नसते. ते कोणत्याही क्षेत्रात आणि भाषेत स्वतःला झोकून देतात. आज कित्येक बॉलिवूड मधील अभिनेत्री तामिळ चित्रपटांमध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे तामिळ चित्रपटांमधील अभिनेत्री सुद्धा आपल्याला बॉलिवूड मध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. तसेच अनेक मराठी अभिनेत्री सुद्धा बॉलिवूड मध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. त्यातीलच एक मराठी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी कोलवालकर. नुकतेच तिने ‘एंड काऊंटर’ या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे.


१) पहिला हिंदी चित्रपट तू केला आहेस तर त्या बद्दल काय सांगशील?
हो, हा माझा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ह्या आधी मी मराठी चित्रपट केलेला त्याचं नावं होत ‘मिसमॅच’. ह्या चित्रपटामध्ये मी एक कादंबरी लेखिकेचं काम केलं आहे जिचं नावं रेणू आहे. ती खूपच मॉडर्न विचारांची मुलगी आहे. पण ती जरी मॉडर्न विचारांची असली तरी तिची तत्वे आणि मूल्य खूपच पक्की आहेत. कोणताही शॉर्टकट न वापरता सरळ मार्गाने सर्व काम ती करते.

२) चित्रपटातील रेणू आणि खऱ्या आयुष्यातील तू ह्या दोघींमध्ये किती फरक आहे?
दोघींमध्ये फरक तर खूप आहे पण त्यात एकच गोष्ट सारखी आहे ती म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याआधी विचार करून सर्व गोष्टी करते.

३) चित्रपटामध्ये लिव इन रिलेशनशिप दाखवले आहे, तर तुझा त्याच्यावर किती विश्वास आहे?
मी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या लोकांकडे फारसे लक्ष देत नाही. पण मी त्यांच्या निर्णयाचा आदर करते.

४) मराठी चित्रपटांमधून अचानक हिंदी चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय का घेतलास?
मराठी चित्रपटांमधील माझे काम हे हिंदी चित्रपटातील डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांना आवडले आणि म्हणूनच त्यांनी माझी हिंदी चित्रपटासाठी निवड केली. मी माझ्याकडून मला जेवढे शक्य होईल तेवढे प्रामाणिकपणे काम केले असून प्रेक्षकांना चित्रपट पाहताना असं वाटणारच नाही की मी मराठी अभिनेत्री आहे. मी हिंदी चित्रपट करतेय तर मी हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्रींप्रमाणेच काम केले आहे.

५) ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये किती मनमोकळेपणा असतो ?
मी तर सध्या मनमोकळेपणाने कोणालाही आपल्या मनातलं सांगत नाही. या चित्रपटामध्ये कोणतेही वाईट सीन नाहीत. पात्राला शोभेल असाच पोशाख या चित्रपटामध्ये आहे.

६) या चित्रपटामध्ये काम करण्याचा उद्देश काय होता ?
या चित्रपटाचे डायरेक्टर अलोक श्रीवास्तव यांनी एक खूपच सुंदर स्टोरी लिहिली आणि ती मला खूपच आवडली. एकंदरीत चित्रपटांमध्ये दोनच प्रकारचे पात्र असतात, त्यांपैकी एक ग्लॅमरस तर दुसरा साधा असतो. या चित्रपटासाठी मी खूपच मेहनत घेतली होती.

७)चित्रपट, टिव्ही आणि वेबसीरिज या तीन माध्यमांमध्ये काय फरक आहे ?
प्रत्येक कलाकारांसाठी तीन ही माध्यम हे एकसारखेच असतात. प्रत्येकालाच चांगले काम करायचे असते मग ते क्षेत्र कोणतेही असो.

८) आमच्या प्रेक्षकांना तुझ्या पुढच्या प्लॅन बद्दल काय सांगशील ?
मी सध्या तरी अल्ट बाला यांच्या ‘पंचबीट’ या एका वेबसीरिजमध्ये काम करत आहे. या वेबसीरिज मधील माझे पात्र हे चित्रपटातील सुष्मिता सेन यांच्या पात्राला मिळते-जुळते आहे.

९) ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे ?
एक म्हणजे खूपच छान अशी स्टारकास्ट आणि दुसरं म्हणजे क्राइम, ड्रामा, कॉमेडी आणि त्याचसोबत एक वेगळीच लव्हस्टोरी अनुभवायला मिळेल आणि प्रेक्षकांना हे सर्व नक्कीच आवडेल.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

‘एंड काउंटर’ म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना- मृण्मयी कोलवालकर

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.