प्रेरणादायी आईची शौर्यगाथा – हिरकणी…


 

‘हिरकणी’ म्हटलं कि सर्वप्रथम आठवते ती शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातली गोष्ट आणि आता हीच गोष्ट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इरादा इंटरटेंमेंट निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘प्रत्येक आई असतेच… हिरकणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या घरी असलेल्या तान्ह्या बाळासाठी हिरकणी रायगडाचा पश्चिम कडा उतरली होती. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कड्यावर बुरुज बांधून त्याला हिरकणी बुरुज असे नाव दिले.

ही गोष्ट आपण सर्वांनी वाचली आहे. आता हीच कथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी दिग्दर्शक प्रसाद ओक याने उत्तम प्रयत्न केलेत. स्त्री प्रधान असा हा चित्रपट असून संपूर्ण कथा हि हिरकणी भोवती फिरतेय. सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटात हिरकणी ही प्रमुख व्यक्तिरेखा लिलया पेलली आहे. सोनाली कुलकर्णीला ह्या आधी आपण वेगवेगळ्या पठडीतील भूमिकांमध्ये पाहिलंय. परंतु १६ व्या शतकातील हिरकणीची तिने साकारलेली व्यक्तिरेखा एक वेगळेच प्रदर्शन घडवते. सोनालीने ह्या व्यक्तिरेखेसाठी घेतलेली मेहनत हि खरच कौतुकास्पद आहे. सोनाली कुलकर्णी व्यतिरिक्त अमित खेडेकर याने चित्रपटात लक्षवेधी अशी भूमिका साकारली आहे. अभिनयाच्या बाबतीत चित्रपटातील सर्वच कलाकार हे उत्तम आहेत. कच्चा लिंबूच्या यशानंतर एक वेगळा आणि लोकांच्या मनाला भिडेल असा विषय घेऊन प्रसाद ओक याने लोकांच मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. कोण होती हिरकणी? तिचं आयुष्य कसं होत? तिची छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारी श्रद्धा,भक्ती इथपर्यंत ह्या सर्व गोष्टी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतू प्रेक्षकांच्या नजरेतून तिचा पराक्रम हा अधिक महत्वाचा होता ते दाखवण्यात कदाचित कमी पडल्याचे जाणवते.

हिरकणी १६७४ साली तब्बल २ हजार ७०० फुट खोल बुरुज उतरून आपल्या बाळासाठी खाली येते. चित्रपट पाहताना तिचा हा पराक्रम खूपच कमी वेळात संपतो असे जाणवते. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी हि अतिशय सुंदर आहे. भव्यता चित्रपटाला शोभेशी अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला, शिवराज्याभिषेक सोहळा दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत हि चित्रपटातील प्रत्येक फ्रेम मधून जाणवते. तसेच स्पेशल इफेक्टचा हि ह्या चित्रपटात वापर केला आहे. पुस्तकात वाचलेली छोटीशी गोष्ट त्याचे चित्रपटात रुपांतर करणे हे कठीण असते पण हिरकणीच्या बाबतीत संहितेचे लेखन हे चिन्मय मांडलेकर याने उत्तम पार पडले आहे. चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. राज्याभिषेक गीत, जगनं हे न्यारं झालं जी, सुरात आलं उरात आलं आणि आईची आरती. त्यातील राज्याभिषेक गीत नक्कीच मनाला भिडतंय. मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारा आणि त्यांच्या तत्वांवर चालणारा आहे. ही गोष्ट लक्षात ठेऊन अमितराज ह्याने उत्कृष्ट असे संगीत दिले आहे. चित्रपटातील छोट्या छोट्या चुका वगळता यंदाच्या दिवाळीत ‘हिरकणी’ हा चित्रपट नक्की बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर ताबा करेल असे जाणवते.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

प्रेरणादायी आईची शौर्यगाथा – हिरकणी…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.