जिद्दी पाटलाची कहाणी | ट्रेलर तुमच्या भेटीला…


पाटील | Patil Official Trailer | Marathi movie

पाटील सिनेमाचा ट्रेलर रिलीज सोहळा संपन्न

वयात येताना शिक्षण की प्रेम याचा योग्य तो निर्णय घेणे आणि आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणे, या विषयावर आधारित व लेखक आणि दिग्दर्शक संतोष मिजगर यांच्या पाटील सिनेमाचा ट्रेलर नुकताच मोठ्या थाटामाटात प्रदर्शित झाला. ब्राईट advertisingच्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये या ट्रेलरची पहिली झलक बघायला मिळाली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते २५ सप्टेंबरला या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. एका बॉलिवूडच्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बॉलिवुड टुरिझम आणि ए. के. एंटरटेनमेंट प्रस्तुत स्टारक्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा. लि. निर्मित पाटील सिनेमाच्या ट्रेलर रिलीजच्या कार्यक्रमासाठी सिनेमातील मुख्य नायक कृष्णा म्हणजेच नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, दिग्दर्शक आणि अभिनेते संतोष मिजगर आणि पाटील सिनेमाची बाकी टीम उपस्थित होती. यावेळी नरेंद्र देशमुख याने सांगितले की, “पाटील सिनेमामध्ये माझी कृष्णा पाटील नावाची भूमिका आहे. आणि त्याला एका मुलीवर प्रेम होतं. पण नंतर त्याला कळतं की आधी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, मग आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करतो तेव्हा त्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. अशा आशयाचा “पाटील” हा सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तो पण ब्राईटच्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये ही खूप अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.”

तसेच यावेळी उपस्थित प्रतिमा देशपांडे हिने आपल्या भावना मांडताना सांगितले की, “पाटील हा माझा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमामध्ये मी एक मुंबईच्या पायल नावाच्या मुलीची भूमिका करत आहे. या सिनेमातील कृष्णा म्हणजेच नरेंद्र देशमूख जेव्हा मुंबईमध्ये येतो आणि पायलला भेटतो त्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं ही गोष्ट आहे. तसं शूटींग पूर्ण होऊन जवळ जवळ दीड वर्ष झालं आणि आता या सिनेमासाठी घेतलेली मेहनत मोठ्या पडद्यावर बघताना खूप आनंद होतोय. आणि ब्राईट advertisingच्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये आमच्या सिनेमाचा ट्रेलर लॉंच होणं ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.”
तर या सिनेमाचे संतोष मिजगर यांनी या सोहळ्याविषयी आणि सिनेमाविषयी सांगताना म्हंटले की, “समाजातील प्रत्येक वर्गाने ज्यांचे आपल्या आई-वडिलांवर प्रेम आहे, या विषयावर हा सिनेमाचा विषय मांडण्यात आला आहे. स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाहीत त्याचप्रमाणे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण पैसे लागत नाहीत. त्यासाठी हवी असते ती मेहनत आणि लगन. हाच विषय या सिनेमामध्ये मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाला खूप मोठं साहेब बनवण्याची आणि त्या इच्छा पूर्ण करताना त्यांना आणि त्यांच्या मुलाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. पण तो मुलगा त्या अडचणी दूर करून यश कसं मिळवतो अशा जिद्दी पाटलाची कहाणी म्हणजे “पाटील” सिनेमा. या सिनेमाचे मिडिया पार्टनर ब्राईट advertising च्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये ट्रेलर रिलीज करण्याची खूप मोठी संधी मिळाली, त्याबद्दल ही मी ब्राईट advertisingच्या योगेश लखानी यांचे खूप आभार मानतो. त्यांना पाटील सिनेमाची कथा आवडली होती म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त व ब्राईट advertisingच्या अवॉर्ड प्रोग्राममध्ये ट्रेलर रिलीज करून दिला, त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानतो.

 

Movie : पाटील

Cast: Bhagyashree Mote & Narendra Deshmukh | 26 Oct Presenting you the official trailer of Upcoming Marathi Movie “Patil” (2018). Starring Santosh Mijgar, Narendra Deshmukh, Bhagyashree Mothe, & Pratima Deshpande Producers: Jay Mijgar, Tejal Ketan Shah,Neeta Laad, Satish Govindwar, Gopichand Padalkar, Madhukar Lolge & Rupesh Taak Director: Santosh Rammeena Mijgar

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

जिद्दी पाटलाची कहाणी | ट्रेलर तुमच्या भेटीला…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.