अंडरवर्ल्ड, गॅंगवॉर आणि एन्काऊंटर यांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत. अंडरवर्ल्ड आणि सिनेमा ह्यांचे अतूट संबंध आहेत. त्यावरच आधारित ए.जे. एंटरटेनमेंट प्रस्तुत, जतीन उपाध्याय निर्मित आणि अलोक श्रीवास्तव दिग्दर्शित ‘एंड काऊंटर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या चित्रपटात प्रशांत नारायणन आणि मृण्मयी कोलवालकर हे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. ह्या चित्रपटासंदर्भात प्रशांत नारायणनने कॅफेमराठीशी दिलखुलास गप्पा मारल्या.
‘एंड काऊटर’ ह्या चित्रपटात प्रशांत एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. हा पोलीस अधिकारी प्रत्येक काम शॉर्टकटने करत असतो आणि अचानक त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते जी त्याला तो किती चुकीचा आहे आणि त्यामुळे त्याचं आयुष्य कसं वाईट होतं चाललयं ह्याची जाणीव करून देते. हा चित्रपट फक्त गुन्हेगारीवर अवलंबून नसून त्यामध्ये कॉमेडी, सस्पेंस आणि प्रेमकथाही प्रेक्षकांना पहायला मिळेल असं प्रशांत नारायणनने कॅफेमराठीशी बोलताना सांगितले. ह्या चित्रपटाचे शूटींग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये झाले आहे. ह्या आधीही प्रशांत खूप साऱ्या चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसून आला आहे. कोणतीही भूमिका असली तरी तो खूप मन लावून करतो असंही प्रशांत सांगत होता. एंड काऊंटर चित्रपटातील भूमिकेसाठी प्रशांतने खूप मेहनत घेतली असल्याचे तो म्हणाला. २१ व्या शतकामध्ये पोलीस, अंडरवर्ल्ड, गॅंगवॉर आणि बिल्डर्स यांच्यामध्ये नेमके काय चालू आहे ते प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळेल असं प्रशांत नारायणन म्हणाला. तसेच ह्या चित्रपटातील सर्व गाणी खूप छान असून ती राहुल जैन याने दिग्दर्शित केली असल्याचे प्रशांत नारायणन म्हणाला. ह्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धमाल केल्याचेही तो सांगत होता. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्ग ठराविक नसून सर्व वयोगटातील लोक त्याचा आस्वाद घेऊ शकतात, असेही प्रशांत सागत होता.
ह्या चित्रपटात प्रशांत नारायणन आणि मृण्मयी कोलवालकर सोबतच अभिमन्यू सिंग, अनुपम श्याम, व्रिजेश हिरजी, उदय टिकेकर, एहसान कुरेशी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्हिलन रणजीत देखील ह्या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे. येत्या ८ फेब्रुवारीला ‘एंड काऊंटर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल अशी आशा प्रशांत नारायणनने व्यक्त केलीय. एक वेगळी अशी कथा आणि दमदार स्टारकास्ट असलेला ‘एंड काऊंटर’ लोकांना कितपत रुचेल हे लवकरच कळेल.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0