मालिका ते चित्रपट असा घडला अक्षयाचा प्रवास…..


मराठी सृष्टीने अनेक नव्या कलाकारांना आपल्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. त्यातच मराठी मालिका हा मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा भाग आहे. मराठी मालिकांचे चार मोठे चॅनल्स जे महाराष्ट्रात तर लोकप्रिय आहेतच पण महाराष्ट्राबाहेर ही लोकप्रिय आहेत. ह्या मालिकांसाठी अनेक छोट्यामोठ्या शहरातून,गावांतून लोक ऑडिशन्ससाठी येतात आणि निवडक व्यक्तींचे त्यातून सिलेक्शन होते. मालिकांमध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर त्या कलाकारांची धाव असते ती चित्रपटांमधील मुख्य भूमिका मिळवण्यासाठी. अशाच मालिका ते चित्रपट प्रवास केलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया हिंदळकर. हिने मराठी रंगमंचावर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुलस्वामिनी’ ह्या मराठी मालिकेतून आपली उपस्थिती दर्शवली होती. तिने मुख्य भूमिका बजावली नसली तरी तिने आपल्या विलक्षण अभिनय कौशल्याने सर्व रसिक प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले होते.

मालिकांच्या कथानकामध्ये जसा ट्वीस्ट येतो तसाच काहीसा ट्वीस्ट अक्षयाच्या अॅक्टींग जर्नीमध्ये देखील आला. 7 Seas Production & Dream Weaver Production प्रस्तुत ‘रॉकी’ ह्या आगामी चित्रपटात अक्षया हिंदळकर ही आपल्याला मुख्य भूमिका बजावताना दिसणार आहे. ‘बागी-२’ ह्या हिंदी चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अदनान ए. शेख हे ‘रॉकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक असून प्रशांत त्रिपाठी, मानेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर हे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला मूळासकट नष्ट करणारा असा डॅशिंग ‘रॉकी’. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षया हिंदळकर हिने कॅफेमराठीशी दिलखुलास गप्पा मारल्या.

रॉकी हा चित्रपट एक अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स अशा सर्व गोष्टींचा कॉमपॅक असून प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम ह्या चित्रपटात दाखवण्यात आले असल्याचे अक्षया म्हणाली. चित्रपटातील नायकाच्या आयुष्यात एक अशी मुलगी असते जी त्याच्यावर खूप प्रेम करत असते. आणि त्या मुलीची म्हणजेच संजनाची भूमिका अक्षया ह्या चित्रपटात करत आहे. संजना खूप बोलकी, प्रेमळ, आयुष्याची मनसोक्त मजा घेणारी अशी मुलगी असते. तिच्या आजूबाजूला काही वाईट घडत असेल तर त्या वाईट गोष्टीविरुद्ध आवाज उठवणारी ही मुलगी आहे. असं वर्णन अक्षयाने स्वतःच्या चित्रपटातील पात्राबद्दल केले. ‘सरस्वती’ आणि ‘कुलस्वामिनी’ ह्या दोन्ही मालिकांनंतर खूप ऑडिशन्सनंतर मला ‘रॉकी’ चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी सिलेक्ट करण्यात आलं. तर ‘रॉकी’ हा चित्रपट माझ्या आयुष्याचा एक टर्निंग पाॅइंट ठरला, असे अक्षया म्हणाली. चित्रपट आणि मालिका ह्या दोघांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. कारण चित्रपटामध्ये एकच पात्र खूप दिवस न चालता वेगवेगळ्या संधी मिळतात. तर मालिकांमध्ये एकच पात्र वर्षानुवर्ष चालत राहतं. तर हा एक वेगळा अनुभव होता आणि खूप आव्हानं ही आली पण त्या आव्हानांवर मात करून खूप एन्जॉय करत माझं पात्र केल्याचे अक्षया सांगत होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज व्यक्ती ह्या चित्रपटात आहेच पण सर्व भाषेतील चित्रपटसृष्टीत आपल्या अॅक्शन, ड्रामा, अॅक्टिंगची छबी उमटवलेला खलनायक, अॅक्शन हिरो राहुल देव ह्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव तर आयुष्यात कधी न विसरण्याजोगाचं होता, असेही ती म्हणत होती. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणारा नायक संदीप साळवे ह्याचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे त्याच्या सोबत ही काम करताना कुठेच बर्डन असल्यासारखे वाटले नाही तर खूप सपोर्टीव वाटल्याचे अक्षया म्हणाली. ह्या चित्रपटादरम्यान खूप मजा मस्ती केल्याचेही अक्षया म्हणाली. ह्या चित्रपटादरम्यान करिना कपूरच्या ‘जब व्ही मेट’ चित्रपटातील पात्राला आणि आलीय भट ह्या दोन हिंदी सृष्टीतील अभिनेत्रींना फॉलो केल्याचे अक्षया सांगत होती. आणि त्यामुळे एक वेगळाचं आत्मविश्वास मिळाल्याचे ही अक्षया म्हणाली. ह्या चित्रपटातील संजना आणि आणि खऱ्या आयुष्यातील अक्षया ह्या दोघींमध्ये खूप साम्य असल्याचेही ती म्हणत होती.

रॉकी हा चित्रपट येत्या ८ मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र प्रदर्शित होणार असून ह्या चित्रपटातून महिला किती पॉवरफूल असतात हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचे अक्षया म्हणाली आणि अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स ह्यांचा पॉवरपॅक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा अक्षयाने व्यक्त केली आहे. ‘रॉकी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी कितपत मनोरंजनाची पर्वणी ठरतोय हे येत्या ८ मार्चला कळेलच…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

मालिका ते चित्रपट असा घडला अक्षयाचा प्रवास…..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.