संतोष जुवेकर झाला माफिया….


सध्या गाव आणि खेड्यांचे शहरीकरण होताना आपण पाहत आहोत. या शहरीकरणासाठी लागणारे दगड, सिमेंट हे डोंगर फोडून खाणीच्या खाणी खणून त्यातून माती काढून मिळवले जातात. खोदकामामुळे घटत जाणारी पाण्याची पातळी यामुळे निसर्गावर होणारे परिणाम आणि हानी या सर्वांची जाणीव करून देणारा श्री नटराज पिक्चर्स प्रेझेन्टस ‘अधम’ हा चित्रपट येत्या २८ जून ला तुमच्या भेटीस येत आहे. तुषार अनिल खांडगे निर्मित आणि अभिषेक केळकर दिग्दर्शित ‘अधम ‘ ह्या चित्रपटाचे पोस्टर, टीझर, ट्रेलर नुकतेच सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. ह्या चित्रपटात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ह्या चित्रपतानिमित्ताने संतोष जुवेकर याने कॅफेमराठीशी गप्पा मारल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतला रावडी आणि डॅशिंग म्हणून ओळखला जाणारा हिरो म्हणजे संतोष जुवेकर, ज्याला लाडाने ‘संत्या’ असं म्हणतात. प्रायोगिक नाटके, चित्रपट, मालिका असो वा वेबसिरीज सर्व माध्यमांमध्ये संतोष जुवेकरची एक वेगळीच छबी आपल्याला पाहायला मिळते. अशीच वेगळी छबी आता आपल्याला त्याच्या आगामी सिनेमा ‘अधम’ मध्ये ही दिसणार आहे. ‘अधम म्हणजे विनाशाकडे जाणाऱ्या वाटेला शासन करणारा’ असे ह्या चित्रपटातील शीर्षकाचे त्याने वर्णन केले. ह्या चित्रपटात संतोष हा ‘विक्की’ची भूमिका साकारतोय. विक्की हा एक अँग्री यंग मॅन आहे. जो गावातील अनाथ आणि टपोरी मुलगा असून त्याला गावातील एका मोठ्या व्यक्तीने लहानाचे मोठे केले आहे. त्या व्यक्तीच्या मोठमोठ्या खाणींमध्ये विक्की काम करत असतो. विक्कीच्या आयुष्यात नंदिनी नावाची मुलगी येते. ती आल्यावर त्याच्या आयुष्यात घडणारे बदल आणि त्याच्यावर येणाऱ्या अडचणींवर तो कशाप्रकारे मात करतो हे ह्या चित्रपटात बघायला मिळेल.

ह्या चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच आपल्याला रुपेरी पडद्यावर संतोष आणि गौरी ही रोमॅंटिक जोडी दिसणार आहे. गौरी सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता आणि ती अभिनेत्री म्हणून ही खूप चांगली असल्याचे संतोष म्हणाला. ह्या चित्रपटाचे संगीत आणि गाणी ही खूप छान आणि वेगळ्या पठडीतील असल्याचे त्याने सांगितले. नाटक,मालिका आणि सिनेमा ह्या तिन्ही मनोरंजन माध्यमात संतोषने काम केले असून तिन्ही माध्यमात खूप काही महत्वाचे पैलू त्याला शिकायला मिळाले. तो पुढे सांगतो कि, खऱ्या आयुष्यातील संतोष आणि चित्रपटातील विक्की ह्या दोघांमध्ये फक्त आयुष्य आणि राहणीमानाचा फरक आहे . ह्या चित्रपटामुळे चांगली कथा आणि चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचेही तो नमूद करतो. तसेच ऑफसेटही किंवा शूटिंग दरम्यान मजा, मस्ती करत संपूर्ण शूटिंग केल्याचे त्याने सांगितले.

ह्या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पुण्याजवळील खाणींमध्ये झालेलं असून सर्व लोकेशन हे वास्तविक आहेत. शहरीकरणाच्या नावाखाली दगड आणि सिमेंट मिळवण्यासाठी खाणींची केलेली दुर्दशा ही अत्यंत वाईट असल्याचे त्याने सांगितले. ह्या चित्रपटात संतोष जुवेकर आणि गौरी नलावडे हे प्रमुख भूमिकेत असून किशोर कदम, शशांक शेंडे,सुहास पळशीकर, उमेश जगताप, सुहास शिरसाट, पद्मनाथ बिंड अशी कास्ट आपल्याला दिसणार आहे. एक आगळा वेगळा विषय आणि संतोष – गौरी ही नवीन जोडी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा संतोषने व्यक्त केली आहे. बऱ्याच काळानंतर आलेला संतोषचा ‘अधम’ हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत रुचेल हे येत्या २८ जून ला कळेलच…

Comments 0

Leave a Reply

संतोष जुवेकर झाला माफिया….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.