सफर करूयात अंटार्टीका महासागराची………….


 

आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अंटार्टीका महासागरावरती. आज आपल्याला अंटार्टीकेच्या भूमिवर ऊतरायचे आहे. ईतके दिवस समुद्रातून जाणारी आपली बोट आता अंटार्टीका सिमेवर येऊन पोहोचली आहे. आता आपण जाणार आहोत लिमेर चॅनलवर. सहा किलोमीटर लांबीचा हा बर्फाचा अरूंद रस्ता. दोन्ही बाजूला ऊंचच ऊंच कडे, आणि तितकीच ऊंच बर्फाछादीत शिखरे. अतिशय शांत अशा समुद्रामध्ये   सुंदर, स्वच्छ पडलेल त्याच प्रतिबिंब. त्याचबरोबर हिमनद्यांची म्हणजे ग्लेशिअरची चादर आणि आईसबर्गचे पडलेले मोठमोठे तुकडे आणि त्याच्यावर शांत झोपलेले भलेमोठे सिंह.

जेव्हा लिमेर चॅनलच्या ईथून आपली बोट जात असते तेव्हा आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर फोटो काढण्याचा मोह तरी काही केल्या आवरत नाही. म्हणून या निसर्गरम्य अशा समुद्रधनीला कोडॅक गॅप असे म्हणतात. परंतु ईथे मात्र कॅप्टनची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण या ठिकाणी बर्फ खूप पडलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी बर्फाचे मोठे खडे दिसतात. कारण बोटीमध्ये बसलेल्या असंख्य प्रवाशांचा जीव हा कॅप्टनच्या हातामध्ये असतो. आता आपल्याला अंटार्टीकाच्या जमिनीवर पाऊल ठेवायचे आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला रबरी बोटीमध्ये उतरावे लागते, त्याला जोडीया असे म्हणतात. मग ती जोडीया आपल्याला किना-यावर सोडते. परंतु किना-यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला खास असा पोशाक दिलेला असतो. लाल जॅकेट, लाल पॅंट ते सगळे घालून आपण जेव्हा त्या ठिकाणी पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला अंटार्टिकाचे रहिवाशी असे म्हणतात, असे पेंग्विंनांना वाटते. भरपूर असे पेंग्विन आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. काळी पाठ, पांढरे पोट आणि पंख म्हणजे दोन हात असे भराभर चालत ते आपल्याला भेटायला येतात. पण त्यांच्या डोळ्याभोवती असतो तो काळा असा पट्टा, पाय असतात नारंगी आणि चोचही असते नारंगी त्यांना गेंटू जातीचे पेंग्विन असे म्हणतात. तसेच हनवटीखाली जो पट्टा असतो त्याला म्हणतात चिंचट्रॅप आणि डोक्यावर मोठा असा तुरा असतो त्याला म्हणतात माकृण. असे तीन प्रकारचे पेंग्विन आम्ही ईथे पाहिले.

पेंग्विनची फॅमिली तर खूपच गजबजलेली असते. कारण माधीला भिडवण्यासाठी ते छोटे छोटे असे घरटे तयार करतात. कधी कधी तर शेजा-याच्या घरट्यातील दगडी सुद्दा चोरतात. पण शेजा-याने जर चोरताना पकडले तर भांडण खूप जोरात होते. या पेंग्विनची पिल्ल सुद्धा दोनच असतात. पेंग्विनच्या पिलांना त्यांची आई आपल्या चोचीने भरवते. पण हेच पेंग्विन जर समुद्रातून बर्फामध्ये उतरले तर त्यांची एकामागून एक परेड सुरू होते. पण परेड मध्ये एखादा आळशी असतो. तो मस्तपैकी पोटावर झोपून स्केटींग करत जातो. याच पेंग्विनच्या विष्ठेला उग्र असा वास कित्येक दिवस येत असतो. ईतके सुंदर हे प्राणी आपल्या गुलाबी विष्ठेमध्ये लोळत असतात.

बोटीवर काही धाडसी उपक्रम होते. कयाकिंग म्हणजे केळ्याचा आकार असलेली बोट असते. या बोटीमध्ये फक्त दोन व्यक्ती बसू शकतात. पण या बोटीचा फायदा असा की, हि बोट छोट्या गल्ली मधून ये-जा करू शकते. जर एखादा आईसबर्ग आणि जलचर असेल तर त्याचे जवळून दर्शन घेऊ शकता.

पोलर डिप कसरत म्हणजे थंडगार अशा पाण्यामध्ये स्विमिंगचे कपडे घालून डुबकी मारायची. त्याचप्रमाणे भन्नाट कसरत म्हणजे एखाद्या बेटावर तुम्हाला रात्री सोडतात आणि तिथे तुम्हाला रात्र काढायची असते. बेटांमध्ये तुमच्या आकाराचा खड्डा खणायचा आणि झोपण्याचे सामान त्या खड्ड्यामध्ये टाकून निवांत असे झोपून जायचे ते सकाळ होईपर्यंत. या तिन्ही कसरती म्हणजे धमाल, मज्जा आणि मस्ती त्याचबरोबर एक विलक्षण असा अनुभव.

दुस-या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो आणि वाटेतच ड्रेक शेकने दणका दिला. आमची बोट तीस फूट लाटांवरती हेलकावे घेत होती, बोटीमध्ये धड ऊभेही राहता येत नव्हते. आमची ती बोटीमधील शेवटची रात्र होती. देवाकडे खूप प्रार्थना करत आम्ही गाढ झोपी गेलो. दुस-या दिवशी डोळे ऊघडले तर समुद्र शांत झालेला होता. अंटार्टीक महासागराचा हा सफर अदभुत असाच होता. जलचर, सागरी पक्षी, हिमनद्या आणि पेंग्विन यांच्या बरोबर मी देखील धमाल केली. पण तिकडून परत घरी येण्याचा मोह काही आवरत नव्हता.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

सफर करूयात अंटार्टीका महासागराची………….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.