हिंदी अल्बम ते मराठी चित्रपट निर्मितीचा असा घडला नागेश मिश्रांंचा प्रवास….


कॉलेजची पाच – सहा वर्षे म्हणजे फुल एन्जॉयमेंट, धमाल, मस्ती, राडा, मारामाऱ्या, ब्रेकअप-पॅचप असा माहोल सर्वत्र आपल्याला कॉलेज भोवती पाहायला मिळतो. कॉलेजची वर्षे हि आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची वर्षे मानली जातात. पण काही मुलं कॉलेजचं आयुष्य हे फक्त मजामस्ती मध्येच घालवतात. अशाच चार मित्रांवर आधारलेला हरिहर फिल्म्स प्रस्तुत ‘आम्ही बेफिकर’ चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाचे निर्माते नागेश मिश्रा असून समय मराठे हे दिग्दर्शक आहेत. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. ह्या चित्रपटानिमित्त नागेश मिश्रा ह्यांनी कॅफेमाराठीशी गप्पा मारल्या.

नागेश मिश्रा हे गेल्या ६ वर्षांपासून निर्मितीची जबाबदारी पार पाडत आहेत. नुकतीच त्यांनी हिंदी मध्ये टायगर श्रॉफ सोबत मायकल जॅकस्न वर आधारित ट्रिबूटचे सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. हिंदी सृष्टीत तर खूप साऱ्या अल्बमची निर्मिती त्यांनी केली आहे पण मराठी चित्रपटसृष्टीत ‘आम्ही बेफिकर’ द्वारे हे त्यांचे पहिलेच पदार्पण आहे. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून कॉलेजचं जग पडद्यावर अवतरणार असल्याचे नागेश मिश्रा कॅफेमराठीशी बोलताना सांगत होते. खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले असा ह्या चित्रपटाचा आशय असल्याचे नागेश सांगत होते. नागेश मिश्रा ह्यांना ह्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अनेक आर्थिक अडचणींना ही सामोरे जावे लागले. पण त्या अडचणींवर मात करून हा चित्रपट तयार केल्याचे नागेश म्हणाले. अनेक हिंदी अल्बमची निर्मिती केल्यानंतर अचानक मराठी चित्रपट निर्मित करण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेल्याचे ते सांगत होते. तसेच ह्या चित्रपटाची स्टारकास्ट ही खूप मेहनती असल्याचे ते म्हणाले.

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अनेक मराठी चित्रपटांनी खास करून दुनियादारी, क्लासमेट ह्यांसारख्या चित्रपटांनी, त्यांच्या कथानकांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे नागेश सांगत होते. हा चित्रपट पूर्णपणे तरुण वर्गावर किंवा युथ जन्रेशनवर आधारित असल्याचे नागेश सांगत होते. ह्या चित्रपटात मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे सोबतच  राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, किर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधूर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. उत्तम कथा, कलाकार, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा हा चित्रपट असून प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी आशा नागेश मिश्रा ह्यांनी व्यक्त केली आहे. ह्या चित्रपटाचा ट्रेलर तर तरुण पिढीवर जादू करतोच आहे, त्याचसोबत ह्या चित्रपटाची गाणी देखील सर्वांच्या तोंडावर आहेत. हा चित्रपट लोकांना खास करून तरुण वर्गाला कितपत रुचेल हे येत्या ८ मार्चला कळेलच…

Comments 0

Leave a Reply

हिंदी अल्बम ते मराठी चित्रपट निर्मितीचा असा घडला नागेश मिश्रांंचा प्रवास….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.