१२ जुलैला सार्वजनिक होणार राकेश बापटचे “What’sApp Love” प्रकरण….


What’s App माहित नाही असा माणूस भारतात शोधून सापडणार नाही. एक प्रकारे What’s App आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण ह्या What’s App वरून आलेल्या संदेशातील भावभावनांचा ओलावा किंवा शब्दांमागील भावार्थ ज्याच्या त्याच्या समजण्यावर अवलंबून असतात. बहुतेकदा त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात आणि पुढे प्रसरण पावतात. What’s App मुळे  संवाद सहज शक्य झाल्याने प्रेमभावना व्यक्त करणही खूप सोपं झालंय. एक ‘HI’ असा मेसेजही समोरच्याला सिग्नल देतो,आणि त्यानंतर जे काही घडत त्यालाच ‘What’s App Love’ म्हणतात. अशाच एका What’s App Love ची गोष्ट सांगणारा एच.एम.जी. इंटरटेनमेंट प्रस्तुत आणि हेमंतकुमार महाले निर्मित आणि दिग्दर्शित सिनेमा येत्या १२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात राकेश बापट आणि अनुजा साठे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच ह्या चित्रपटाचे  ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत.

‘What’s App Love’ ह्या चित्रपटाची कथा ही जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या न त्या मार्गाने घडत आहे. कृत्रिम संबंध, भावभावना जोपासताना तारेवरची होणारी कसरत आणि भौतिक सुखाचा माग घेताना सांडत चाललेला खरेपणा आणि आलेले एकाकीपण नव्या संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून कसे घडते, हे ह्या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न हेमंतकुमार महाले ह्यांनी केला आहे. ह्या सिनेमातील संगीत नितीन शंकर यांनी संगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले,जावेद आली, श्रेया घोषाल, पायल देव, सुफी गायक शबाब साबरी इत्यादींनी स्वरसाज चढविला आहे. कॉन्सर्ट किंग म्हणून संगीतविश्वात ओळखले जाणारे हेमंतकुमार महाले यांचही कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती तसेच अजिता काळे यांची पटकथा- संवाद असलेला ‘What’s App Love’ जेष्ठ सिनेमेटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कॅमेऱ्यातून टिपला आहे.

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मनोरंजन विश्वात स्वतंत्रपणे नाव हॅन्डसम हंक राकेश बापट आणि ‘स्टार’ची फेवरेट बेटी अनुजा साठे हे मुख्य भूमिकेत असून इराणहून थिएटर आर्ट्स शिकण्यासाठी आलेली नाट्य अभिनेत्री सारेह फर, अनुराधा राजाध्यक्ष, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी हे कलावंतही ‘What’s App Love सिनेमात दिसणार आहेत. हे ‘What’s App Love’ प्रकरण कितपत लोकांना रुचेल हे येत्या १२ जुलैला कळेलच….

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

१२ जुलैला सार्वजनिक होणार राकेश बापटचे “What’sApp Love” प्रकरण….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.