२०१९ मध्ये घेतला ह्या ६ मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचा ताबा…


२०१९ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘सुखकर वर्ष’ असे म्हटले तर ते काही वावगं ठरणार नाही. २०१९ ह्या वर्षी १०० हून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही अयशस्वी (फ्लॉप) ठरले तर काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचाच नाही तर बॉक्स ऑफिसचा ही ताबा घेतला. चला तर मग जाणून घेऊयात ज्यांनी २०१९ हे वर्ष गाजवले. ज्यात कॉमेडी, ऐतिहासिक, लव्ह स्टोरी, सस्पेन्स, थ्रिलर अशा सिनेमांचा समावेश होता.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहातच नव्हे तर मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेला चित्रपट म्हणजे ‘ठाकरे’. ज्या माणसाने मराठी समाज आणि मराठी लोकांसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं अशा माणसावर म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यावर आधारलेला अभिजित पानसे दिग्दर्शित चित्रपट म्हणजे ‘ठाकरे’ जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला, आणि बॉक्स ऑफिसवर आपला ताबा मिळवला. ह्या चित्रपटाने हिंदी चित्रपटांचे शो देखील स्वतःच्या नावे करून घेतले. बाळासाहेब ठाकरेंच्या एका फ्री जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी केलेल्या कामापासून ते मराठी माणसांना आणि देशातील राजकीय चळवळीला चांगल्या संधी मिळवून दिल्याबद्दलच्या त्यांच्या मोहिमेपर्यंतचा बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच हिंदी सिनेसृष्टीत नावाजलेले कलाकार मराठी चित्रपटात दिसून आले. नवाजउद्दीन सिद्दीकी ह्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करून मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले. २०१९ च्या सुरुवातीला मराठी बॉक्स ऑफिसवर आपले अधिराज्य गाजवत ३१.१८ करोडची कमाई ह्या चित्रपटाने केली आणि २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

१५ फेब्रुवारी २०१९ला समीर विध्वंस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. स्त्रियांचे शिक्षण निषिद्ध मानले जाण्याऱ्या काळाच्या आधारे, या चित्रपटामध्ये डॉक्टर बनायल्या गेलेल्या आनंदीबाई जोशींचा प्रवास, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आणि त्यांचा नवरा गोपाळराव जोशी यांच्याशी असलेले नाते या चित्रपटामधून दाखवण्यात आले आहे. ह्या चित्रपटातील गाणी ही लोकांनी उचलून धरली. एकूण ७ गाणी ह्या चित्रपटात असून त्यातले ‘रंग माळीयेला’ हे गाणे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून नामांकित केले. ह्या चित्रपटामधून पहिल्यांदाच ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. २०१९ च्या चित्रपटांपैकी सर्वात जास्त रेटिंग असणारा हा आनंदी गोपाळ चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर ही ह्या चित्रपटाने चांगलेच अधिराज्य गाजवले आणि सोबतच २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

ये रे ये रे पैसा’ च्या स्टोरीला एका वेगळं वळण देण्यासाठी दिग्दर्शक हेमंत ढोमे ह्यांनी ‘ये रे ये रे पैसा २’ चित्रित केला. ये रे ये रे पैसा’ मधून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेलं पात्र म्हणजे ‘जग्गू उर्फ अण्णा’ म्हणजेच संजय नार्वेकर. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर जग्गु उर्फ अण्णा (संजय नार्वेकर) यांना जान्हवी (मृणाल कुलकर्णी) यांनी मोठी जबाबदारी दिलेली असते, आणि ह्याच जबाबदारीला अण्णा आणि त्याच्या सोबत असणारे त्याचे मित्रमंडळी कसे पार पाडतात हेच ह्या चित्रपटात कॉमेडीची जोड देऊन दाखवण्यात आले आहे. ह्या चित्रपटाचे संपूर्ण शुटींग हे परदेशात झाले असून मराठीतला सर्वात खर्चिक असा हा पहिलाच सिनेमा आहे. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतले अनेक नावाजलेले चेहरे एकत्रित पाहण्याचा पाहिलाच अनुभव प्रेक्षकांनी डोक्यावर चढवला आणि मराठी प्रेक्षकांसोबतच मराठी बॉक्स ऑफिसवर ही चांगलेच अधिराज्य गाजवले. सोबतच २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

२०१९ मध्ये सर्वात जास्त काळ बॉक्स ऑफिसवर आपली मोहर पकडून ठेवणारा सिनेमा म्हणजे ‘हिरकणी’.  ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड गडाजवळील गावात राहणाऱ्या एका धाडसी आईची गोष्ट जी आपल्या सर्वाना माहित होती. परंतु हीच गोष्ट चित्रपटाच्या रूपाने लोकांसमोर मांडण्याचे धाडस प्रसाद ओक ह्याने केले. हिरकणी ह्या चित्रपटाला लोकांनी एवढे प्रेम दिले की हा चित्रपट २०१९ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडून आला. त्याचसोबत ह्या चित्रपटातील हिरकणी म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर प्रसाद ओक ह्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून अवघ्या महाराष्ट्राने निवडून दिले. सोनाली कुलकर्णीची एक वेगळी छबी ह्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उमटवली. सलग ७ आठवडे यशस्वीरीत्या आपली पकड कायम ठेवून सर्वाधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपले अधिराज्य ‘हिरकणी’ चित्रपटाने गाजवले आणि २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

२०१९च्या समाप्तीतला एक असा चित्रपट ज्याने लहान मुलांचेच नाही तर तरुण आणि वृद्ध व्यक्तीचे देखील मन जिंकले. तो चित्रपट म्हणजे ‘खारी बिस्कीट’. एका लहान बहिण-भावाची अशी अनोखी जोडी दिग्दर्शक संजय जाधव रुपेरी पडद्यावर घेऊन आले कि ज्यांनी प्रेक्षकांना आपले बालपण, आपल्या भावाबहिणींची आठवण करून दिली. ह्या चित्रपटातील सर्वच गाणी ही मनाला लागून जाणारी आहेत. ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता/अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट गायक/गायिका अशी नामांकनं मिळाली असून २०१९ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय जाधव ह्यांना ह्या चित्रपटासाठी संपूर्ण महाराष्ट्राने निवडून दिले. सर्व वर्गातील लोकांच्या मनाचा ताबा तर ह्या चित्रपटाने घेतलाच त्याचसोबत मराठी बॉक्स ऑफिसचा ही ताबा घेत ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवले आणि २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

२०१९ च्या Top ६ मधला अजून एक यशस्वी चित्रपट म्हणजे ‘फत्तेशिकस्त’. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर ह्यानी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले पहिले सर्जिकल स्ट्राईकचे चित्रण दर्शवतो. उत्तम दिग्दर्शन, उत्तम कथानक, अप्रतिम असा सेट, अक्शन, ड्रामा, ऐतिहासिक अस्मितेचे जतन, अप्रतिम अशी गाणी ह्या सर्वांचा उत्तम मेळ ह्या चित्रपटात पाहायला मिळतो. अभिनेता चिन्मय मांडलेकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा तर घेतलाच सोबत मराठी बॉक्स ऑफिसवर जोरदार पकड ठेवत पहिल्याच आठवड्यात ५.१२ करोड रुपयांची कमाई करत २०१९च्या Top ६ मध्ये ही हा चित्रपट आला.

   २०१९ ह्या वर्षाने मराठी सिनेसृष्टीला अनेक वेगवेगळ्या पठडीतले सिनेमे तर दिलेच सोबत काही नवीन चेहरे ही दिले ते कोणते हे जाणून घेण्यासाठी स्टेटून ऑन कॅफेमराठी…..

 

Comments 0

Leave a Reply

२०१९ मध्ये घेतला ह्या ६ मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचा ताबा…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.