करिअरच्या बाबतीत यंदाचं वर्ष खूपच लकी- अभय महाजन


‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ हा सिनेमा येत्या ७ फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. तर ह्यात मुख्य भूमिकेत असलेला अभय महाजन आपल्या अंगावर फक्त एक ट्यूब परिधान करुन मुंबई-गोव्याच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. असा न्यूड गेटअप असलेला एक धाडसी प्रयत्न प्रथमच मराठीतून केला गेला आहे. चला तर मग, हा धाडसी प्रयत्न करण्याचे शिवधनुष्य पेललेल्या अभयलाच विचारु ह्या भूमिकेबद्दल, खास कॅफेमराठी च्या कट्ट्यावर…

ह्या चित्रपटाचे नाव ‘लकी’ आहे पण तू हाफ लकी आहेस, असं ट्रेलरवरुन दिसतयं, त्याबद्दल काय सांगशील?
लकी सिनेमाची गंमत अशी आहे की, त्याचं नाव का लकी पडलं, ह्याची खूप सुंदर गोष्ट सिनेमामध्ये आहे. ह्या चित्रपटातला लकी म्हणजे मी इतरांकरिता लकी आहे, पण त्याला जी गोष्ट हवी असते, त्याबाबतीत तो अनलकी ठरत असतो.

ह्या चित्रपटात बराच सस्पेन्स आहे, मग ते चित्रपटाच्या नावाची स्पेलिंग असो, किंवा पोस्टरमध्ये ट्यूब घालून दाखवलेला तुझा लूक असो, ह्या सर्वांबद्दल काय सांगशील?
ट्यूबमधला लूक एक वेगळा प्रसंग आहे जो सिनेमाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अचानक एक मुलगा मुंबई-गोव्याच्या रस्त्यांवर ट्यूब घालून का फिरतो आहे, त्याच्याबाबतीत काहीतरी अशा घटना घडतात की, तो त्या स्टेजला येऊन पोहोचतो, ह्या घटना नेमक्या कोणत्या हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. ह्या व्यतिरिक्त ही अशा अनेक मजेशीर घटना, गोष्टी तुम्हाला ह्या चित्रपटात पाहायला मिळतील.

बॉलिवूडमध्ये टॉवेल वर दिसलेला रणबीर प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिलाय तसच आता लकी मधून ट्यूबमध्ये दिसलेला अभयही तितकाच प्रेक्षकांच्या लक्षात राहील, पण असा गेटअप करणं किती मोठं चॅलेंज होतं?
मी इथे आवर्जून सांगेन की, माझी बॉडी काही ऋतिक रोशन सारखी नाही. मी ह्यात अत्यंत साधा, सरळ मुलगा दाखवलेला आहे. पण ते म्हणतात ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के..पण इथं मात्र लकी ला देवाने बॅडलक छप्पर फाड़ के दिलेलं आहे. आणि रणबीरबद्दल बोलायचं झालं तर, त्याचं करिअर सध्या चांगलं सुरु आहे, तसं जर माझ्या बाबतीत घडणार असेल तर, मलाही पुढच्या चित्रपटात टॉवेलमध्ये यायला हरकत नाही.

शूटिंगदरम्यान एखादा गंमतीदार किस्सा कॅफेमराठीशी शेअर करशील का?
ह्या चित्रपटात माझा एक कच-याच्या डंप्परमध्ये अडकलेला सीन आहे, त्यात मला ५०-६० फूट वर लटकवलेलं होतं आणि त्यावेळी तितकंच कडाक्याचं उन्हंदेखील होतं, त्यामुळे तो सीन करताना जितकी मजा आली, तितकी हालतही झाली असं मी सांगेन.

पुढील प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगशील?
माझे लकी व्यतिरिक्त अजून ३ सिनेमे ह्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यातील एक अॅक्शनपट आहे. थोडक्यात ह्या वर्षी अभयच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा लोकांना पाहायला मिळतील. ह्याव्यतिरिक्त मी एक वेबसीरिज करतोय, जी मराठीतील खूप मोठी वेबसीरिज असणार आहे. त्याचबरोबर इतर काही सिनेमांवर काम चालू आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच एक्सायटींग असणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

करिअरच्या बाबतीत यंदाचं वर्ष खूपच लकी- अभय महाजन

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.