राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ चित्रपट होणार २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित….


उध्वस्त आयुष्याची, विस्कटलेल्या व्यवस्थेची लांबी, रुंदी आणि खोली सांगणारा स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ची प्रस्तुती असलेला ‘म्होरक्या’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. ‘म्होरक्या’ ही फक्त परेड शिकणाऱ्या एका लहान मुलाची गोष्ट नसून जगाची, इतिहासाची, आपल्या भोवतालच्या प्रत्येकाची गोष्ट आहे. ह्या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमर देवकर असून रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे हे ह्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत.

निर्माता, दिग्दर्शक आणि ह्या सिनेमातील सर्व अभिनेत्यांचा हा पहिलाच चित्रपट असून थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोहोत्सावामध्ये ह्या सिनेमाने आपले ठसे उमटवले आहेत. ‘म्होरक्या ह्या सिनेमाला ६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागातील वास्तव गोष्टींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एका मेंढपाळ समाजातील मुलाची परेद्साठीची धडपड दिसून येतेय. यातून समाजव्यवस्थेतील काही गोष्टींवर भाष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

‘म्होरक्या’ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे सर्वाना घेऊन पुढे जाणारा. ह्या सिनेमात लोकसंगीताचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे आणि आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना थिरकायला भाग पाडणारे गायक आनंद शिंदे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रॅप पद्धतीने गाणं गात आहेत. या गाण्याविषयी बोलताना आनंद शिंदे बोलतात कि, “हे अशा प्रकारचं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. मी लोकगीतं, भीमगीत आणि अनेक गाणी गायली आहेत. हे गाणं लोकगीत असताना देखील वेगळं काहीतरी या गाण्यातून मिळत आहे. या गाण्यातून एक वेगळाच आनंद मला मिळत आहे. हा मान मला मिळाला आहे ह्या बद्दल मी ‘म्होरक्या’ टीमचा आभारी आहे. पोपटापासून आता पर्यंत प्रेम दिलं तसचं या गाण्यालाही द्या” असं आव्हान आनंद शिंदे यांनी केले आहे. कुणाल गायकवाड आणि वैभव शिरोळे यांनी हे गीत लिहिले असून वैभव शिरोळे ह्यांनी संगीतबद्ध केले आहे.

‘म्होरक्या’ ह्या सिनेमात रामान देवकर, अमर देवकर, रामचंद धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोशल मिडीयावर ह्या सिनेमाचे धुमाकूळ सुरु आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून आनंद सहीने ह्यांच्या आवाजातील ‘म्होरक्या – रॅप’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणतंत्र दिनाच्या निमित्ताने २४ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपटा प्रेक्षकांना त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

 

 

Comments 0

Leave a Reply

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ चित्रपट होणार २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित….

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.