5th My Mumbai Short Film Festival


1300 films from 50 Country

 Short film म्हणजे नवोदित Filmmakers साठी सिनेमाचा चंचूप्रवेश. Short Film Festival मध्ये आजच्या तरुणाईकडून नवनवीन आणि धाडसी विषय हाताळले जातात. असाच एक My Mumbai Short Film Festival ३० जानेवारी पासून नवी मुंबईच्या Marathi Sahitya Mandir, Sector 6, Vashi (Navi Mumbai) येथे होणार आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी Panel Discussion, Adobe Workshop, Experts Guide, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या महोत्सवात सहभागी लघुपटांची एकूण संख्या १३०० पेक्षा जास्त असून ५ उपखंड, ५० हुन अधिक देश यात सहभागी आहेत. त्यात विशेष म्हणजे १५ वर्षाच्या नवोदितापासून ते ६५ वर्षाच्या अनुभवी लघुपटकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवासाठी Social Awareness, International Short Films, AD Films, Animation Films, Music Video, Documentary आणि Mobile Shoot Films अश्या एकूण सात category करण्यात आल्या आहेत. प्रदर्शित होणा-या लघुपटांची नामांकने (Screening List) २३ जानेवारी पासून Website  वर उपलब्ध झालेली आहेत.
‘प्रभात चित्र मंडळ’ यांच्या सहयोगाने दि. ३१ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता ‘लघुपट : आशय श्रेष्ठ की तंत्र’ ह्या विषयावर Panel Discussion चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात Prakash Kunte (Director), Ganesh Matkari  (लेखक आणि सिनेसमीक्षक), Sachin Karande (Director) आणि सिनेसृष्टीतील मान्यवर तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चित्रपट लेखक-समीक्षक Santosh Pathare  हे ह्या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविणार आहेत. Adobe ह्या संस्थेच्या सहयोगाने दि. १ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:३० वाजता सिनेसृष्टीतील तंत्रज्ञासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यशाळेत तंत्र सल्लागार Guru Vaidya यांचे कृतीमार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती Universal Marathi चे अध्यक्ष Ajit Jadhav यांनी दिली.
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या महोत्सवाला सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. १ फेब्रुवारी ला होणा-या पारितोषिक वितरण समारंभासाठी Vijay Patkar आणि Nagesh Bhosale ह्या सिनेअभिनेता व दिग्दर्शकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. या महोत्सवाला सर्वाना विनामूल्य प्रवेश असेल पण त्यासाठी www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर नाव नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. अशी माहिती Universal Marathi चे सरचिटणीस Amitraj Nirmal यांनी दिली.
cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

5th My Mumbai Short Film Festival

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.