सुरुवात चुकवू नका अन शेवट कुणाला सांगू नका  –  आपला मानूस


Aapla Manus Marathi Movie…

गेल्या वर्षाची म्हणजे २०१७ ची सुरुवात Satish Rajwade च्या दिग्दर्शनातील सुपरहिट सिनेमा “ती सध्या काय करते” ने झाली. मृगजळ या मराठी सिनेमाने सुरुवात झालेल्या Satishची मराठी सिनेमातील वाटचाल वेगवेगळ्या विषयावरील सिनेमांची होती. एक डाव धोबी पछाड, गैर, मुंबई पुणे मुंबई, बदाम राणी गुलाम चोर, प्रेमाची गोष्ट, पोपट, सांगतो ऐका, ती सध्या काय करते हे सर्व त्याचे सिनेमे वेगळ्या धाटणीचे होते. आज Satish Rajwade चा, Nana Patekar अभिनित आपला मानूस हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

Satish Rajwade च्या सर्व सिनेमावर एकवार नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येते की, Satish नेहमीच वेगळी वाट शोधत असतो. खरंतर एक प्रकारचा सिनेमा हिट झाल्यावर त्याच प्रकारचा सिनेमा करण्याकडे दिग्दर्शकाचा कल असतो. ती सध्या काय करते हा प्रेमाचा हळूवार विषय हिट झाल्यावर Satish सरळ सस्पेन्स धाटणीकडे वळला, खरंतर हे आव्हानात्मक पाऊल होते. परंतु Nana Patekar, Sumeet Raghavan आणि Iravati Harshe अशी दमदार कलाकार मंडळी त्याच्या सोबत असताना त्याने हे आव्हान लिलया पेलले असेच म्हणावे लागेल.

Ajay Devgan सारख्या अभिनेत्याने या सिनेमाच्या गोष्टीवर विश्वास दाखवत या सिनेमाची निर्मिती केली यातच सिनेमाचे यश आहे. इतकेच नव्हे तर सैराट सारख्या हिट मराठी सिनेमानंतर निर्माते Nikhil Sane जे आता वायकॉम १८ मध्ये आहेत, त्यांच्या कुशल निर्मिती आणि हटके प्रमोशनचा या सिनेमाला नक्कीच फायदा होईल आणि पुन्हां एकदा या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेमाला हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळेल. आपला मानूस म्हणजे आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही कथा आहे. शहरी जीवन आणि नात्यांची गुंतागुंत यामध्ये अडकलेल्या पित्याची ही कहाणी आहे.

एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेवर येऊन थांबते. आपला मानूस बद्दल एका वाक्यात सांगायचे झाले तर…सुरुवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका. आज पहिल्याच दिवशी या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच शो ला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड देखील झळकले आहेत. Nana Patekar च्या दमदार सवांदांना सिनेमागृहात शिट्ट्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे. दर्जेदार आशय नेहमीच मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतो…तसंच आपला मानूस बाबत आज घडतंय…व्यवसायचे अनेक विक्रम मोडण्यात सिनेमा नक्कीच यशस्वी होईल असे चित्र दिसते आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

सुरुवात चुकवू नका अन शेवट कुणाला सांगू नका  –  आपला मानूस

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.