Actresses Miss Behaved By Fan’s !!!
खूप प्रसिद्ध वाक्य आहे की “यशस्वी अभिनेत्याला यशस्वी बनवण्यात सर्वात मोठा हात असतो तो चाहत्यांचा!!!” खूप चाहते अथवा Fans असणं ही प्रत्येक Celebrity ची इच्छा असते. पण खरंच प्रत्येक Fan हा एकसारखा असतो का??? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. Celebs ना याचे फायदे आणि तोटे देखील भोगावे लागतात आणि लागलेतसुद्धा ! या गोष्टींमुळे Celebs ना Bodyguard सोबतच घराबाहेर पडावं लागतं. Fans कधी कधी इतके विचित्र वागतात की त्यांचा एक माणूस म्हणून देखील आपल्या Celebs ना वैयक्तिक पातळीवर त्रास होत असतो. त्यातल्या त्यात Actresses सोबत असे प्रकार जास्त घडताना दिसतात. म्हणून तर CafeMarathi आज हा महत्वाचा विषय खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
चला तर मग पाहूयात CafeMarathi सोबत अशा Actresses ज्यांच्यासोबत Fans वागले विचित्र पद्धतीने…..
Sushmita Sen :
Watch Entertainment gossip in Marathi on CafeMarathi App & Website
Sushmita सोबत देखील असाच काहीसा प्रकार घडला कदाचित त्या Fan ने एक पाऊल पुढेच टाकलं. अहो त्याने तर Sushmita ला सरळ लग्नासाठी मागणी घातली. आपल्या Sushmita ने मात्र या गोष्टीला Ignore केलं. मग काय त्या पठ्ठ्याने Sushmita ला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार त्यावेळी Media मध्येही बराच उचलला गेला होता.
Dia Mirza :
Dia बरोबर घडलेला प्रकार जरा विचित्रच होता. तिच्या घरी एक Doctor सारखा काही ना काही कारणांनी ये जा करत असायचा. Dia ला त्या व्यक्तीचं वागणंही विचित्र वाटू लागलं. शेवटी Dia Mirza ने त्या माणसा संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली होती.
Vidya Balan :
Vidya Balan म्हटलं की तिचा Dirty Picture, Kahani आणि Kahani-2 हे तिचे सिनेमे आठवतातच. पुरुष केन्द्री चित्रपटसृष्टीला Vidya ने स्त्रीकेंद्री भूमिका करून एक वेगळच वळण दिलं. Dirty Picture या चित्रपटामुळे तिची Fan Following इतकी वाढलेली की बोलायला नको. पण गाल-बोट तेव्हा लागला जेव्हा एका माथेफिरू Fan ने जबरदस्ती Vidya च्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
Shruti Haasan :
Shruti Hasaan सोबत घडलेला प्रकार भितीदायकच होता. तिच्या घराचा दरवाजा नेहमी एक माणूस दरवाजा ठोकून जायचा. एक दिवस Shruti दरवाजा उघडायला गेली आणि त्या माणसाने दरवाजाच्या फटीतून Shruti चा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.
Genelia D’Souza – Deshmukh :
Genelia सोबत एकदा एका अज्ञात व्यक्तीने गैरव्यवहार केल्याचे समजले. प्रकार असा घडला होता की Genelia एका Store च्या उद्घाटनासाठी विजयवाडा येथे गेली होती. तिथेच उपस्थित असलेल्या त्या अज्ञात माणसाने Genelia सोबत गैरव्यवहार केला आणि Genelia ला या प्रकारचा इतका राग आला होता की तिने त्या माणसाच्या कानफाटात लगावली होती.
Katrina Kaif :
प्रसिद्ध Bollywood Actress Katrina हिलादेखील अशाच घटनेला तोंड द्यावे लागले होते. गोष्टं तशी 2009 ची आहे. एक व्यक्ती Katrina चा पाठलाग करत होता. Katrina ने त्या व्यक्तीला समजावलं आणि समजदेखील दिला पण त्याने Katrina च्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
Kangana Ranaut :
Kangana जेवढी On-Screen बिनधास्त दिसते तेवढीच ती Real Life मध्ये सुद्धा आहे. एक माणूस सतत तिचा पाठलाग करतोय हे तिला समजलं. तिने त्या माणसावर लक्ष देखील ठेवलं. जेव्हा त्या माणसाने तिचा पाठलाग करत Gym मध्ये Entry केली तेव्हा त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं.
For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…
Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App
CafeMarathi iOS Appमनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0