मराठी रंगभूमीवरील पहिल्या सुपरस्टारची कहाणी रुपेरी पडद्यावर…


 

आपलं नाणं खणखणीत वाजतंय…” आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर लवकरच

“आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, एकदम कडक” सध्या सुबोध भावेच्या या डायलॉगने मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करायला सज्ज झालाय. निमित्त आहे “आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर” या सिनेमाचे. नुकताच या सिनेमाचा दुसरा टीझर आला आणि बघता बघता लोकांच्या प्रचंड पसंतीस पडला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘गारंबीचा बापू’, ‘शितू’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘सुंदर मी होणार’, ‘आनंदी गोपाळ’, ‘मधुमंजिरी’ अशा नाटकांतील ज्यांच्या भूमिका तुफान गाजल्या. ज्यांनी व्यावसायिक रंगभूमीला त्यावेळी परत सोनेरी दिवस मिळवून दिले असे डॉ. काशिनाथ घाणेकर. हा सिनेमाची चर्चा झाली आणि पुन्हा त्या सुवर्णकाळाच्या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या.

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले. तर वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि श्री गणेश मार्केटींग अँन्ड फिल्मस् यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत सुबोध भावे शिवाय सुमीत राघवन हा डॉ. श्रीराम लागू, मोहन जोशी हे भालजी पेंढारकर, सोनाली कुलकर्णी ही सुलोचना दिदी, आनंद इंगळे हे वसंत कानेटकर आणि प्रसाद ओक हा प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत दिसतील. या सिनेमाच्या पहिल्या टीझरमध्ये सगळ्या कलाकारांची ओळख करून देण्यात आली आणि दुसऱ्या टीझरमध्ये सुबोध भावे यांच्या डॉ. घाणेकर या भूमिकेची जास्त ओळख दिली आहे.

डॉ. घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्यांचा संभाजी दुसरा कुणीही करू शकणार नाही…अंगकाठी नसली तरी जरब बसवणारे डोळे, उत्भेदक अभिनय आणि आवाज या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. मराठी नाटक परंपरेत स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध करणारा कलाकार शिवाय मराठी नाटकांमध्ये कलाकाराने संवाद म्हटला की, त्याच्यावर शिट्टी वाजवण्याची सुरुवात घाणेकरांपासून झाली. “उसमें क्या है | हे डॉ. घाणेकरांनी बोलल्यानंतर प्रेक्षक तो डायलॉग परत बोलले नाही म्हणजे नवलच.” त्यांची तशी बोलण्याची स्टाईल काही औरच !, ती बोलण्याची लकब सुबोध भावे यांनीदेखील हुबेहूब उचलून धरली आहे. त्यासोबतच स्वतःच्या नावावर नाटकाकडे गर्दी खेचून आणणारा अभिनेता, नाटकाच्या नामावलीत लोकप्रिय अभिनेत्याचे नाव सर्वात शेवटी ठेवण्याची परंपरा ज्यांच्यापासून सुरू झाली ते म्हणजे डॉ. घाणेकर. त्यांची हीच अजरामर कलाकृती सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतीये आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणार हे मात्र नक्की… हा सिनेमा येत्या दिवाळीमध्ये म्हणजे ८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार असून तो सुवर्णकाळ रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

मराठी रंगभूमीवरील पहिल्या सुपरस्टारची कहाणी रुपेरी पडद्यावर…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.