Jagga Jasoos च्या अपयशाचं खापर Anurag च्या माथी !!!


Anurag Is Responsible For Ranbir’s Jagga Jasoos failure !!!

Jagga Jasoos जवळ जवळ तीन वर्षांनी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली. पण Jagga Jasoos ची Box Office वर इतकी वाईट परिस्थिती झाली, की बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागलेला पैसा तरी परत मिळवता आला असेल का??? Ranbir Kapoor ने निर्मिती क्षेत्रात Jagga Jasoos सोबतच पाहिलं पाऊल टाकलं, Ranbir च्या हातात 3 वर्षांच्या संघर्षानंतरही निराशाच लागली. प्रेक्षकहो तुम्ही आता विचार करत असाल चित्रपट Hit किंवा Flop होणं ही नवीन गोष्ट नाहीये. पण आज CafeMarathi ने हा विषय तुमच्यासमोर आणला आहे, त्याचं कारण वेगळंच आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत पाहूयात Jagga Jasoos आत का आलाय पुन्हा चर्चेत !!!

Jagga Jasoos प्रदर्शित झाला – तो पडला, तरीही Officially कोणीच हा चित्रपट इतक्या वाईट पद्धतीने Flop होण्याची जबाबदारी घेतली नाही. पण Rhishi Kapoor यांनी एका प्रसिद्ध वर्तमानपत्राला दिलेल्या एका Interview मध्ये Jagga Jasoos च्या अपयशाला दिग्दर्शक Anurag Basu यांना जबाबदार ठरवलं आहे.

Rhishi Kapoor म्हणतात की “दिग्दर्शक Anurag Basu हे खूप बेजबाबदार दिग्दर्शक आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 3 दिवसांपर्यंत Anurag चित्रपटाची Mixing च करत होते. कोणीही चित्रपटासंदर्भात सल्ला देऊ शकलं नाही कारण शेवटपर्यंत कोणालाच चित्रपट दाखवण्यात आला नाही. त्याच बरोबर Pritam ने देखील Music फक्त एक आठवड्यापूर्वीच सुपूर्त केलं. हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे.”

एवढंच बोलून Rhishi Kapoor थांबत नाही तर ते म्हणतात “जरी तुम्ही खूप प्रसिद्ध दिग्दर्शक असाल तरीही कोणी तुमच्यासोबत काम करण्यासाठी तयार होणार नाही, कारण तुम्ही बेजबाबदार आहात. Govinda ला चित्रपटात घ्यायचंच नव्हतं, तर त्याच्यासोबत Shoot का केलं ?” असा प्रश्न Rhishi Kapoor विचारतात.

Rhishi Kapoor यांच्या बोलण्यातून इतकं तरी नक्कीच जाणवत होतं की, त्यांना Jagga Jasoos च्या अपयशाचा आणि ढिसाळ कामाचा राग आलाय. Anurag सोबत Ekta Kapoor आणि Rakesh Roshan यांना काम करणं पसंत झालं नाही याचंही कारण बेजबाबदारपणाच आहे असं Rhishi Kapoor म्हणतात.

हा राग चित्रपटाच्या अपयशाचा आहे की Anurag च्या बेजबाबदारपणाचा हे कळणं जरा अवघड आहे, पण Rhishi Kapoor यांच्या वक्तव्यावर दिग्दर्शक Anurag काही प्रतिउत्तर देतात का, हे पाहणं महत्वाचं ठरेल !!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Jagga Jasoos च्या अपयशाचं खापर Anurag च्या माथी !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.