कोकणमध्ये ट्रिप करण्यासाठी बेसिक गाईड


Basic Guide To Your Konkan Holiday

कोकण हे जगातल्या  सर्वोत्कृष्ठ  पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. दरवर्षी शेकडो लोक इथली आकर्षक ठिकाणं आणि साहसी प्रवासाची मज्जा घेण्यासाठी येतात. आपण जर कोकणातले असलो तर दरवर्षीची सुट्टी कोकणात ठरलेलीच असते, पण नेहमी त्याचा एक वेगळाच आनंद असतो. जर तुम्ही पहिल्यांदा हि ट्रिप ठरवत असाल तर खाली दिलेल्या पॅकिंग टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 

 

१. हलके कपडे घाला : या दिवसात प्रचंड गरमी असल्यामुळे जाड फॅब्रिक असलेले कपडे सोबत घेऊ नका. कोणालाच घामाने भिजायला आवडत नाही. शुभ्र रंगांचे कपडे शक्यतो कमी घाला कारण लाल मातीने ते खराब होण्याची शक्यता आहे. उन्हापासून वाचण्यासाठी सनस्क्रीन सोबत ठेवा. कपड्यांना घडी घालण्या ऐवजी ते रोल करून बॅग मध्ये ठेवा यामुळे तुम्हाला जास्त गोष्टी ठेवायला जागा मिळेल आणि कपड्यांना सुरकुत्या पडणार नाहीत.

२. स्विम वेअर किंवा बीच वेअर : कोकणाला समुद्र किनाऱ्यांची चांगली साथ लाभली आहे. आणि ते पर्यंटन स्थळ असल्यामुळे तिथे मजेदार वॉटर राईड्स सुरु केले आहेत. शेवटच्या क्षणी बीच राईड्सची योजना बनू शकते त्यामुळे एखादे जास्तीचे स्विम वेअर किंवा बीच वेअर नक्की सोबत ठेवा.

३. कोकणातील जेवण : कोकण हे मांसाहारी पाककृतीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही शाकाहारी असाल तर कदाचित तिथले जेवण तुम्हाला आवडणार नाही. हॉटेलचं जेवण टाळून स्थानिक जागेवर किंवा खानावळमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या, कारण कोकणातल्या खाद्याची मूळ चव ही तिथल्या स्थानिक जागेवरच आहे.

 

४. ट्रेकिंग : अलिबाग, सिंधुदुर्ग या जागा किल्ल्यांचे ठिकाण आहेत. ट्रेकचा प्लॅन असल्यास तुम्ही भरपूर पाणी आणि हलके खाद्यपदार्थ जवळ ठेवणे आवश्यक आहे. गॉगल, टोपी, ट्रेकिंग शूज, सॉक्सचा जास्तीचा जोड, फर्स्ट-एड बॉक्स सोबत घ्यायला विसरू नका.

५. वाहतूक : तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत नसाल तर कोकणातल्या एसटीने प्रवास करणे योग्य ठरेल. यामुळे रिक्षा आणि खाजगी गाड्यांचा खर्च वाचेल आणि चुकामुक होण्याची शक्यता कमी असेल. इथले लोकल बस ड्राइवर सुद्धा प्रवासात चुकामुक झाल्यास खूप मदत करतात.

६. गॅजेट्स ऐवजी पुस्तक : कोकण हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे तुम्ही फोन, लॅपटॉप वैगरे बाजूला ठेऊन प्रवासात गाडीतून दिसणाऱ्या नैसर्गिक देखाव्याचा आनंद घ्या. ज्या स्थळांना भेट द्यायची आहे त्या जागा एकमेकांपासून दूरवर असू शकतात, अशा वेळी तुम्ही वेळ घालवण्यासाठी सोबत पुस्तक ठेऊ शकता.

 

७. शॉपिंग : अलिबाग, गोवा ही शॉपिंगसाठी उत्तम स्थळ आहेत. इथे तुम्हाला विविध पद्धतीचे हॅन्ड बॅग्स, चप्पल, खाद्यपदार्थ जसे की काजू,  गोवन मिठाई, वाइन; रत्नागिरीमध्ये आंबे, सावंतवाडीमध्ये लाडकी खेळणी आणि घर सजवण्याची लाडकी शो पीस इ. विकत घेता येईल.

८. भारी सामान नेण्याचे टाळा: जितक्या कमी आणि नेमक्या गोष्टी असतील तितके सोपे जाईल. झीप लॉक बॅग, रिकामी बाटली, अशा गोष्टी मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्याच्या कामी येतील.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

कोकणमध्ये ट्रिप करण्यासाठी बेसिक गाईड

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.