Bucket list romantic song shoot in Malaysia…
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर ने गोड करणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याच शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीसोबत या चित्रपटात नेमका कोणता कलाकार पाहायला मिळणार हा प्रश्न कित्येकांना पडला होता. नुकताचं या प्रश्नाचं उत्तर सुमित राघवनने त्याच्या सोशल मिडियावरून दिलं आहे. हो! सुमित राघवन हा हरहुन्नरी अभिनेता बकेट लिस्टच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरीबरोबर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील रोमॅंटिक गाण्याच्या शूटींगसाठी माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन तसेच बकेट लिस्टची टीम मलेशियात (लंकावी) जाऊन पोहोचली आहे. ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे. या मलेशिया सफारी निमित्ताने सुमित राघवनच्या बकेट लिस्टमधील एक
इच्छा पूर्ण झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0