F.U. Friendship Unlimited | Movie Review 1.5/5


फक्त प्रयत्न अनलिमिटेड…

खूप दिवसांपासून ज्या मराठी चित्रपटाची उत्सुकता होती तो F.U. आज प्रदर्शित झाला. F.U. म्हणजेच Friendship Unlimited. या चित्रपटाचा Teaser Launch झाल्यापासूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा चित्रपट तरुण मित्रांवर आधारित आहे. प्रेमभंग, दारू हे असणार याला शिक्कामोर्तब झालाच होता.

अपेक्षित भव्यतेसोबत हा सिनेमा सुरु होतो. कॉलेज विश्वातील त्या गमती जमती, मुलांची ती भाषा असं सर्व काही होतं. चित्रपट जस जसा पुढे सरकत होता तस तसा प्रेक्षकांचा भ्रमनिरासच होतो. अर्थात चित्रपटाबद्दल जसं बोललं गेलं होतं, तितक्याच भव्यतेने तो बनवला गेला. चित्रपट फ्रेश वाटतो अगदी! पण फक्त देखाव्यानेच चित्रपट तयार करता आले असते तर मग क्या बात ! अभिनयाचा पत्ता बरेच जण विसरल्याचं या चित्रपटात अनुभवायला मिळतं. आपल्या परश्याला वेगळ्या लूक मध्ये, वेगळ्या भूमिकेत पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा विश्वास मात्र फोल ठरतो. जेव्हा जेव्हा Akash Screen वर बोलतो तेव्हा तेव्हा आपल्या समोर परश्या म्हणून उभा राहतो, हे Mahesh Manjrekar यांचं दिग्दर्शक म्हणून सर्वात मोठं अपयश आहे असं म्हणावं लागेल. Mahesh Manjrekar हे Marathi चित्रपट सृष्टीतलं मोठं नाव. आतापर्यंच्या Mahesh Manjrekar यांच्या पार्श्वभूमीला पाहता प्रेक्षकांच्या हाती निराशाच लागते. खरंच इतक्या गाण्यांची गरज होती का ? १४ पैकी एकही गाणं बाहेर आल्यावर लक्षात राहत नाही.

संपूर्ण चित्रपटामध्ये बोलताना Akash Thosar हा शहरी परश्याच वाटलाय, सत्याचा अभिनय (?), हा एक चर्चेचा विषय आहे आणि उर्वरित कलाकारांची उपस्थिती ही फक्त आणि फक्त Need आहे Story ची.  Isha Koppikar, Chetan Hansraj, Sachin Khedekar, Boman Irani यांसारख्या अभिनेत्यांचा अक्षरशः फक्त वापर केलाय. Vaidehi Parshurami, Sanskruti Balgude ह्याच Screen वर एक Freshness आणतात. दोघींचंही काम बऱ्यापैकी जमलंय त्यांना.

एकंदरीत हाती लागली फक्त निराशाच!!!

CafeMarathi कडून या सिनेमाला मिळतायत दीड टाळ्या…

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

F.U. Friendship Unlimited | Movie Review 1.5/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.