Friday Filmy War : चित्रपटांचा पाऊस !!!  


Friday Filmy War 21st July 2017

मागच्या Friday ला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी Jagga Jasoos ने अपेक्षित असलेली तर Lapachhapi ने अपेक्षित पेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली दिसली आहे. भयपटाचा एक उत्तम नमुना म्हणून Lapachhapi चं नाव पुढे नक्कीच करता येईल. आता मुद्द्यावर येऊयात ! प्रत्येक Friday प्रमाणे आजही नवीन चित्रपट प्रेक्षकांना भेटण्यासाठी प्रदर्शित झाले आहेत. आज मराठीत Manjha, Bus Stop तर हिंदीमध्ये Lipstick Under My Burkha आणि Munna Michel असे एकूण 4 चित्रपट आज प्रदर्शित होणार आहेत.

चला तर मग CafeMarathi सोबत थोडं-फार जाणून घेऊयात त्या सिनेमांबद्दल…  

Manjha | मांजा

मराठी चित्रपटसृष्टीचे सोनेरी दिवस आलेत, ते खरंच आहे. एकाहून एक चांगले चित्रपट आणि त्यांचे विषय बाहेर येताना दिसतायत. आता हेच पहा ना मंडळी, Manjha हा चित्रपट Thriller आणि Drama या पठडीत मोडणारा आहे. पण चित्रपटाचं Promotion आणि अगदी Bollywood ला तोडीस तोड असलेला Trailer, यामुळे Manjha ने प्रेक्षकांना धरून ठेवलं आहे.

नवऱ्याच्या जाचाला कंटाळून Samidha (Ashwini Bhave) तिच्या मुलासोबत म्हणजेच Jaydeep (Rohit Phalke) सोबत एका वेगळ्या ठिकाणी नवऱ्यापासून दूर येते. पण Jaydeep चा नुकताच झालेला मित्र Vicky (Sumedh Mudgalker) जो मानसिक रोगी असतो, तो देखील Jaydeep ला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी भाग पडतो. पण या सर्व जाळ्यातून Samidha आपल्या मुलाला बाहेर काढू शकेल का ? Samidha चा असलेला संघर्ष नक्की कोणाशी आहे? तिचा चाललेला संघर्ष ती जिंकू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला Manjha पाहावा लागेल. Manjha चे दिग्दर्शन Jatin Wagle यांनी केलेले आहे.

Bus Stop | बस स्टॉप  

Multi-Star ही संकल्पना सहसा आपल्याला मोठ्या प्रमाणात Bollywood मध्येच पाहायला मिळते, पण आता मराठी चित्रपट देखील पाठी नाही ! आज प्रदर्शित झालेला Bus Stop देखील एक Multi-Star चित्रपटच आहे. आताची High-Tech तरुण मंडळी आणि त्यांचे पालक यांच्यातील नातेसंबंधांवर, प्रेमावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे Bus Stop !!! या चित्रपटामध्ये आपल्याला Pooja Sawant, Aniket Vishwasrao, Amruta Khanvilkar, Siddharth Chandekar, Hemant Dhome, Rasika Sunil, Akshay Waghmare आणि Suyog Gorhe हे तरुण मुलांच्या भूमिकेत आहेत तर Vidyadhar Joshi, Uday Tikekar, Avinash Narkar, Sanjay Mone, Sharad Ponkshe आणि Manjusha Godse हे सर्व पालकांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. Bus Stop मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तगडी Star-Cast आहे. याचा चित्रपटाला किती फायदा होतो, हेच पाहणं गरजेचं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन Sameer Joshi ह्यांनी केलेलं आहे.

Lipstick Under My Burkha | लिपस्टिक अंडर माय बुरखा

Lipstick Under My Burkha हा चित्रपट बऱ्याच कारणांनी चर्चेत होता. या चित्रपटाचा Poster मग त्यानंतर Censor Board सोबतचा वाद अशी बरीचशी कारणं या चित्रपटाला Spot-Light मध्ये आणत गेली. एकंदरीत या चित्रपटामध्ये 4 अशा स्त्री-व्यक्तिरेखा दाखवल्या आहेत ज्या समाजाच्या चौकटीबाहेर जाऊन स्वतःचा आनंद शोधू पाहताहेत. आता त्या चारही स्त्री-व्यक्तिरेखा यात यशस्वी होतात की नाही हे चित्रपट पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल. या चित्रपटातील स्त्री-व्यक्तिरेखा Ratna Pathak Shah, Konkana Sen Sharma, Plabita Borthakur आणि Aahana Kumra यांनी साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन Alankrita Shrivastava यांनी केले आहे.

Munna Michel | मुन्ना मायकल

Tiger Shroff चे आतापर्यंत 3 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांनी Box Office वर चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे Munna Michel कडून Tiger ला खूप अपेक्षा आहेत. Munna Michel च्या आयुष्याची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. Munna Michel हा तीन बत्ती या ठिकाणचा राहणारा असतो. त्याचं प्रेरणास्थान Michel Jackson हा असतो. पण आयुष्यात भरकटलेला Munna कसा आपल्या स्वप्नांकडे वळतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो ! हीच गोष्ट आहे Munna Michel ची ! यामध्ये Romance आणि Action देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला Tiger Shroff सोबत Niddhi Agerwal, Nawazuddin Siddiqui आणि Sana Saeed Screen Share करताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन Sabbir Khan यांनी केलं आहे.

एक मात्र नक्की, प्रेक्षकांना आज चित्रपटाची Quantity वाढलेली दिसली, तरी ते जाणार मात्र Quality कडेच !  

Upcoming Marathi Movies :

28th July 2017 (Shentimental & Mala Kahich Problem Nahi, Indu Sarkar, Mubarakan, Bhetali Tu Punha)

4th August 2017 (Bhikari, Jab Harry Met Sejal)

11th August 2017 (Kachha Limbu, Toilet: Ek Prem Katha)

18th August 2017 (Haseena Parkar, Bareilly Ki Barfi)

25th August 2017 (A Gentleman, Babumoshai Bandookbaaz)

8th September 2017 (Dry Day & The Silence)

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : चित्रपटांचा पाऊस !!!  

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.