Friday Filmy War : मराठीत झाली गर्दी, कुणाला मिळेल वर्दी ???


Friday Filmy War 26th May 2017

गर्दी… घरात अचानक खूप पाहुणे आल्यावर जशी घरच्या माणसांची भंबेरी उडते तशीच गत आता मराठी Audience ची झाली आहे. अहो खरंच. तुम्हीच बघा ना गेल्या शुक्रवारी फक्त एकच मराठी सिनेमा होता. पण आता मराठीत Khopa (खोपा), Karar (करार), Oli Ki Suki (ओली की सुकी) आणि Tatva (ताटवा) हे चार तर हिंदी मध्ये Sachin: A Billion Dreams हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. Baahubali 2 हा Running Fast असताना मराठीतल्या चार आणि हिंदीतल्या एका सिनेमापैकी कुणाच्या वाट्याला काय येईल काही सांगता येत नाही. मराठीत Option असल्याने कुण्या एकाला कौल मिळेल कि नाही ? ते तुम्हीच ठरवा….

Khopa | खोपा

आजवर अनेक मराठी सिनेमांचे लेखन करणारे लेखक Dr. Sudhir Nikam यांचा दिग्दर्शनातला पहिला प्रयत्न म्हणजे खोपा हा मराठी सिनेमा. आजच्या पैशाच्या युगात मानवी नातेसंबंध कमी मोलाचे वाटू लागले आहेत. मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक जवळचे वाटू लागले आहे कारण त्यात स्वार्थ नाही. बाकी सर्व नात्यांमध्ये एकप्रकारचा स्वार्थ आहे. अशाच विषयावर गुंफण्यात आला आहे खोपा. खोपा म्हणजे एक एक काडीने तयार केलेले घरटे, घर होय. अशा घराची सर्वांनाच आस लागलेली असते. हळूवार प्रेमाच्या गोष्टीने महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेणारा हा खोपा तुम्हाला आवडेल का ? सिनेमात Sankarshan Karhade, Aishwarya Tupe, Bharat Ganeshpure, Yatin Karyekar, Vikram Gokhale, Siddheshwar Zadbuke यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 Oli ki Suki | ओली की सुकी

Friday Filmy War 26th May 2017

नावावरूनच हा सिनेमा लहानग्यांच्या भावविश्वाभोवती आहे हे लक्षात येतं. ओली की सुकी हा लहानपणीचा खेळ. या सिनेमात परिस्थितीमुळे आणि योग्य मार्गदर्शनाअभावी समाजाच्या दृष्टीने वाया गेलेल्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे. ज्या वयात मनावर संस्कार होतात त्या वयात निखळ वस्तीत राहणारी, झोपडपट्टीत राहणारी मुलं म्हणून समाज त्यांना दूर झिडकारतो. मग ही मुलं खरोखरच कु मार्गाला लागतात असा या सिनेमाचा विषय आहे. Anand Gokhale दिग्दर्शित या सिनेमात Tejashree Pradhan, Bhargavi Chirmuley, Sanjay Khapre, Sharvari Lohokare, Suhas Shirsath, Chinmay Sant यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tatva | ताटवा

Friday Filmy War 26th May 2017

अभिनेते Arun Nalawade यांचा दिग्दर्शनातील पहिला प्रयत्न म्हणजे ताटवा सिनेमा. ताटवा म्हणजे काय याचा अर्थ समजला नसेल तुम्हाला. ताटवा म्हणजे बांबूच्या कुंपणातील एक छोटी जागा. आपण २१ व्या शतकात असलो तरी अजुनही काही ठिकाणी जात-पात धर्म यावरून वागणुकीत होणारा भेदभाव दिसून येतो. याकडे लक्ष वेधणारा हा सिनेमा शिल्पकलेला देखील प्रोत्साहन देणारा आहे. कला, प्रेम यासोबत समाजातील विषमता यात दर्शवण्यात आली आहे. चित्रपटात Sanjay Shejwal, Gauri Konge, Arun Nalawade, Dr. Sharayu Pazare, Devendra Dodke, Dr. Sarita Garde, Vikrant Borkar, Kamlakar Borkar, Shital Raut, Sadanand Borkar, Manjusha Joshi यांच्या विशेष भूमिका आहेत.

Karar | करार

Subodh Bhave आणि Kranti Redkar यांच्या प्रमुख भूमिका असेलेला करार अखेर आज प्रदर्शित झाला आहे. समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा या सिनेमात मांडली आहे. आयुष्याला केवळ ‘करार’ म्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या यात मांडण्यात आल्या आहेत. आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वाबद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा कुटुंबवत्सल प्रेक्षकांना किती आकर्षित करतो हे पाहणं अधिक उत्सुकतेचे ठरेल. सिनेमाचे दिग्दर्शन Manoj Kotian यांनी केले आहे.

Sachin: A Billion Dreams | सचिन : बिलियन ड्रीम्स

Friday Filmy War 26th May 2017

Sachin Tendulkar म्हणजे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत. भारतीयच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतातले सर्वात मोठे नाव. आपल्या दमदार खेळाने त्याने मिळवलेली दैदिप्यमान किर्तीचा आढावा या सिनेमात घेण्यात आला आहे. हा सिनेमा म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. Sachin: A Billion Dreams हा सिनेमा म्हणजे सचिनचे जीवनचरित्र आहे. या सिनेमात सचिनच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ३५ व्या वर्षापर्यंतच्या सर्व महत्वाच्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन James Erskine यांनी केले आहे. क्रिकेटच्या मैदानावरचा सचिनचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे नक्कीच छान अनुभव असणार आहे.

आता इतके मराठी सिनेमे एकाचवेळी आल्याने कुणाचं भवितव्य काय असेल सांगणे कठीण झाले आहे. सर्वच आपल्या परीने प्रयत्न करत आहेत हे मात्र खरे. परंतु प्रेक्षकांच्या मनात काय चाललंय हे ओळखणं कठीण आहे. बघुया आता प्रेक्षक मराठीला जवळ करतात की हिंदीला ???

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : मराठीत झाली गर्दी, कुणाला मिळेल वर्दी ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.