Friday Filmy War : प्रेक्षकांना कोणता चित्रपट भावेल ???


Friday Filmy War 28th July 2017

प्रेक्षकांनो आज Friday ! नेहमीप्रमाणे आजही नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मराठी, हिंदी म्हणत म्हणत Box Office वर सर्वांचीच शर्यत लागणार आहे . कमाई त्यातला एखादाच चित्रपट करतो, पण मनोरंजन मात्र सर्व प्रेक्षक-रसिकांचं नक्की होणार ! बरं का मंडळी असा हा आपला Filmy Friday !!! आजही मनोरंजनासाठी एकूण 5 चित्रपट तुमच्या भेटीला आले आहेत ! त्या 5 चित्रपटांपैकी Indu Sarkar, Raag Desh आणि Mubarakan असे तीन हिंदीतील तर Shentimental आणि Bhetli Tu Punha असे दोन मराठीतील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हा आठवडा प्रेक्षकांसाठी देशभक्तीने भरपूर असा आहे.

चला तर मग CafeMarathi सोबत आजच्या Friday Filmy War मध्ये एन्ट्री झालेल्या चित्रपटांची थोडीशी माहिती बघूयात…      

Indu Sarkar | इंदू सरकार

काही दिवसांपासून Indu Sarkar चित्रपट राजकीय कारणांमुळे बराच चर्चेत आहे. Indu Sarkar हा चित्रपट 1975 ते 1977 मधील भारताच्या परिस्थितीचे भाष्य करतो. Indu Sarkar हा चित्रपट जेव्हा Indira Gandhi यांनी भारताच्या पंतप्रधान पदी असताना आणीबाणी जाहीर केली तेव्हा लोकांवर त्याचे काय परिणाम झाले, तसेच Indira Gandhi आणि त्या वेळच्या बऱ्याच अंतर्गत गोष्टींबाबत भाष्य करतो. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन Bollywood चे प्रसिद्ध दिग्दर्शक Madhur Bhandarkar यांनी केले आहे. Indu Sarkar मध्ये आपल्याला Anupam Kher, Niel Nitin Mukesh, Kirti Kulhari आणि Supriya Vinod हे अभिनय करताना दिसतील.

Raag Desh | राग देश

Raag Desh हा एका अर्थाने देशभक्तीपर चित्रपट आहे. Netaji Subhash Chandra Bose यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा संपूर्ण भारताच्या सैनिकांनी 1945 मध्ये ब्रिटिशांविरोधात बंड पुकारलं होतं, त्यावेळेची ही गोष्ट. या विरोधात 23,000 INA च्या सैनिकांना ब्रिटिशांनी कैद केलं होतं, तर तीन मुख्य अधिकाऱ्यांवर Court Marshal चा खटला चालवण्यात आला होता. हा खटला दिल्लीतील लाल किल्ल्यात चालावला गेला होता. याच कारणाने या खटल्याला Red Fort Trials of 1945 म्हणून ओळखले जाते. ह्या विषयावरच Raag Desh हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन Tigmanshu Dhulia यांनी केलं आहे. आपल्याला या चित्रपटात Kunal Kapoor, Amit Sadh आणि Mohit Marwah Lead Role मध्ये दिसणार आहेत. 

Mubarakan | मुबारका

राजकारण आणि देशभक्ती या जड आणि भावनिक विषयांमुळे भारावलेल्या प्रेक्षकांना हलक्या-फुलक्या विनोदांनी हसवण्यासाठी Mubarakan हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आज आलेला आहे. Censor Board ने चित्रपटामधील एकाही Scene वर कात्री न फिरवता, Mubarakan चित्रपटाला एकदम Clean चित्रपट म्हणून आधीच घोषित केलं आहे. या चित्रपटामध्ये Arjun Kapoor आपल्याला Karan आणि Charan या दोन जुळ्या भावांच्या Role मध्ये दिसणार आहे. त्यातला एक चंदीगड मध्ये तर दुसरा लंडन ला असतो. Karan आणि Charan या दोघांच्या लग्नासाठी मुलींची पाहणी करताना आणि चित्रपटातील त्यांचा मामा Anil Kapoor मुळे उडणारा गोंधळ ! या सर्व गोष्टींमुळे नक्कीच प्रेक्षकांचं हसु आवरणार नाही, असं Mubarakan च्या Team चं म्हणनं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन Anees Bazmee यांनी केलं असून, या चित्रपटामध्ये आपल्याला Anil Kapoor आणि Arjun Kapoor व्यतिरिक्त Ileana D’cruz आणि Athiya Shetty देखील Screen Share करताना दिसणार आहेत.      

Shentimental | शेंटीमेंटल

आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा Ashok Saraf यांचा Shentimental ! Ashok Saraf यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच Shentimental चित्रपटाबद्दल Shentimental चे दिग्दर्शक Sameer Patil यांनी घोषणा केली होती. Ashok Saraf आहेत म्हणजे विनोद असणारच ! Shentimental मध्ये आपल्याला Ashok Saraf यांच्या सोबत Upendra Limaye, Vikas Patil, Pallavi Patil, Suyog Gorhe आणि Raghubir Yadav हे देखील अभिनय करताना दिसणार आहेत.    

Bhetli Tu Punha | भेटली तू पुन्हा

मराठी आणि Bollywood दोन्ही ठिकाणी आपल्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित करणारा Vaibhav Tatwawadi आणि सलग 3 आठवड्यात 3 चित्रपटांमधून चित्रपटगृहामध्ये झळकणारी Pooja Sawant हे या चित्रपटाचे Lead Actors आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन Chandrakant Kanse यांनी केले आहे. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक माणसं ही आयुष्यभरासाठी नसतात. पण जी आयुष्यभरासाठी असतात त्यांना आपण खरंच ओळखतो का ??? त्यांना ओळखण्यासाठी तेवढा वेळ देतो का??? वेळ मिळाला तरी व्यक्त होता येतं का ??? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना आयुष्यातल्या साथीदाराला ओळखण्यासाठी जेव्हा पुन्हा प्रयत्न केला जातो तेव्हा भेटणारी ती” म्हणजे  Bhetli Tu Punha ! आता त्याला” “ती” कशीकुठेकाभेटते या सगळ्यांची उत्तरं मिळवण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.  

प्रेक्षकांना पर्याय जरी भरपूर असले तरीही प्रेक्षकांच्या मनाला भावणारा चित्रपट कोणता ते प्रेक्षकाच ठरवतील !!!

Upcoming Marathi Movies :

4th August 2017 (Bhikari, Jab Harry Met Sejal)

11th August 2017 (Kachha Limbu, Toilet: Ek Prem Katha)

18th August 2017 (Haseena Parkar, Bareilly Ki Barfi)

25th August 2017 (A Gentleman, Babumoshai Bandookbaaz)

8th September 2017 (Dry Day & The Silence)

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : प्रेक्षकांना कोणता चित्रपट भावेल ???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.