Friday Filmy War : सिनेमांचा पडतोय पाऊस, पण Box Office कोरडे…


Friday Filmy War 9th June 2017…
पाऊस हवा तसा येईना आणि मराठी सिनेमा काही थांबेना अशी गत झालीय. या शुक्रवारी देखील मराठीत झरी, अॅटमगिरी, धोंडी, त्राटक हे चार आणि हिंदीत राबता आणि बहेन होगी तेरी हे दोन बडे चित्रपट Release झाले आहेत. प्रेक्षक ठरवतील मराठी पहावे की हिंदी. यापैकी नाहीच काही जमलं तर आहे इंग्रजी सिनेमा द मम्मी. CafeMarathi सोबत बघूया आजचा Filmy Friday war.

Zari

भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाले तरी आदिवासींचा प्रश्न कायम आहे. Raju Meshram लिखित, दिग्दर्शित Zari सिनेमातून कुमारी मातांचा प्रश्न मांडण्यात आला आहे. Namrata Gaikwad, Aniket Kelkar, Milind Shinde, Nisha Parulekar, Tukaram Bidkar, Nagesh Bhosle, Anant Jog, Ganesh Dive यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला Pravin Kumar यांचे संगीत लाभले आहे. सिनेमात छत्तीसगडी, वऱ्हाडी आणि तेलगू या तीन भाषांचा संगम आहे.

Itemgiri

नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल सिनेमा काय आहे ते. कॉलेज विश्वातील मुलांच्या भावनेचा आढावा यात घेण्यात आला आहे. प्रेम या भावनेभोवती सिनेमा गुंफण्यात आला आहे. सिनेमात Rajeshwari Kharat, Hansraj Jagtap, Milind Shinde, Chaya Kadam यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Fandry सिनेमानंतर शालू अर्थात Rajeshwari Kharat प्रथमच या सिनेमातून Heroin प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन Pradip Tonge यांनी केले आहे.

Dhondi

अनंत काळापासून शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे तशाच आहेत. धोंडी हा सिनेमा देखील शेतकरी आत्महत्येवर भाष्य करणारा सिनेमा आहे. शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करणे हे या सिनेमातून दाखवण्यात आले आहे. Late Vinay Apte यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. सिनेमात Sayaji Shinde, Pooja Pawar, Kishor Chougule, Late Vinay Apte, Usha Naik, Vivek Chabukswar यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Monish Pawar यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Raabta

Raabta Movie म्हणजे तद्दन Indian Romantic Thriller सिनेमा. धोनी नंतर पुन्हा एकदा Sushant Singh Rajput ला पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सोबत kriti Sanon, Jim Sarbh यांच्या देखील सिनेमात मुख्य भूमिका आहेत. अजून एक महत्त्वाचं म्हणजे Deepika Padukone देखील एका Title song मध्ये दिसणार आहे. Dinesh Vijan यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाला Pritam चे संगीत लाभले आहे.

Bahen Hogi Teri

एकाच गल्लीत राहणाऱ्या तरुण तरुणींचे गमतीशीर चित्रण यात केलेले आहे. लखनौ मध्ये राहणाऱ्या Rajkumar Rao आणि Shruti Haasan यांची ही गोष्ट आहे. सिनेमात Darshan Zariwala आणि Gulshan Grover यांच्या प्रमुख भुमिका आहेत. Ajay Pannalal यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
चार मराठी सिनेमे सोबत दोन मोठे हिंदी आणि तगडा इंग्रजी या गणितात मराठीला किती मार्क मिळतात ते पुढील दोन दिवसातच कळणार आहे.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Friday Filmy War : सिनेमांचा पडतोय पाऊस, पण Box Office कोरडे…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.