‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये शनायाला टक्कर प्रियंकाची


Grand Entry of Apurva Chaudhari in Mazya Navryachi Bayko
अपूर्वा चौधरीची ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये धमाल एन्ट्री!
ज्या टीव्ही मालिकेच्या आपण प्रेमात पडावं.. आणि पाहता पाहता आपण त्या मालिकेत काम करावं.. हे सर्व तुम्हाला स्वप्नमय वाटत असणार, परंतु हे सत्यात अवतरलं आहे ते पुण्याच्या अपूर्वा चौधरीच्या बाबतीत. पुण्याच्या ललित कला केंद्राची विद्यार्थिनी असलेल्या अपूर्वाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या सिनेमात एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत अपूर्वा आता प्रियंका नावाची शनायाच्या घरात काम करणारी अवलिया मोलकरीण साकारते आहे, पहिल्याच भागात तिच्या धमाकेदार एन्ट्रीचे सगळीकडे कौतुक झाले.
ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी घेऊन मुंबईत आल्यावर ‘सुसाट’ नावाचे नाटक, ‘दुहेरी’ नावाची मालिका, ‘क्राईम फाईल’, ‘क्राईम पेट्रोल’ यात छोट्या मोठ्या भूमिका अपूर्वा करत होती. अचानक तिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेकरता ऑडिशनसाठी बोलावण्यात आले, आणि पहिल्याच प्रयत्नात अपूर्वाची निवड करण्यात आली.
या भुमिकेबद्दल अपूर्वा सांगते की, “जरी ही मोलकरणीची भुमिका असली तरी धमाल विनोदी अशी भुमिका आहे. शनायाला पुरून उरेल असा तिचा स्वभाव आहे, कानात हेडफोन घालून गाणे ऐकत काम करणे तिची सवय आहे. खरंतर प्रियंका वेगळाच हेतू घेऊन आली आहे, मालिका पाहतांना प्रेक्षकांना ते समजेलच. सर्वांसोबत काम करताना खूप मज्जा आली, कुणीही दडपण जाणवू दिले नाही. सगळ्यांप्रमाणे माझीही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अपेक्षा करते. याशिवाय ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्यावरील तयार होत असलेल्या हिंदी सिनेमात देखील माझी भूमिका आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये शनायाला टक्कर प्रियंकाची

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.