हलाल चे बीज गावातच मिळाले – शिवाजी लोटन पाटील


Halal Upcoming Marathi Movie…

आपल्याला एखाद्या सिनेमासाठी National Award मिळाल्यानंतर Audience ची आपल्याकडून अपेक्षा वाढते, हे जरी खरं असलं तरी त्यासाठी आशयघन सिनेमाची निर्मिती करण्याचे धाडस कुणी केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी व्यक्त केली. 6 ऑक्टोबर पासून त्यांचा Halal हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला विशेष सवांद…

Halal Upcoming Marathi Movie...

Shivaji Patil सांगतो की, खरंतर धग सिनेमासाठी मला National Award मिळाल्यानंतर मी लगेचच Halal साठी तयारी केली होती. अनेक निर्मात्यांना भेटलो पण प्रकरण पुढे सरकत नव्हते. याच दरम्यान मी 31 ऑक्टोबर हा हिंदी सिनेमा करत होतो. ज्यात Pritam Kagne देखील काम करत होती. सोबत तिचा भाऊ Amol Kagne देखील माझ्यासोबत होता. दोघांना Halal ची गोष्ट ऐकवली. त्यांना खूप भावली आणि जराही विलंब न करता Amol ने या सिनेमाची निर्मिती करण्याचे धाडस दाखवले. मनापासून सांगायचं तर Halal सिनेमाचे बीज माझ्या गावातच मला मिळाले होते. जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याश्या खेड्या गावात मी लहानाचा मोठा झालोय. तिथे गावात अनेक गरीब मुस्लीम कुटुंब मी पाहिले आहेत, त्यांच्या परंपरा, सण सर्व काही जवळून पाहिले होते.

Halal Upcoming Marathi Movie...

विषय कसा सुचला याबद्दल Shivaji सांगतो की, Rajan Khan यांच्या एका कथा संग्रहात Halal ची कथा मी वाचली आणि त्यावर काम सुरु केले. Halal सिनेमा, ट्रिपल तलाक पद्धतीवर कडाडून भाष्य करणारा सिनेमा आहे. आज जरी सरकारने त्यावर ठोस पाउलं उचलली असली तरी दुर्गम भागात अजूनही अशा घटना घडत आहेत, ज्याकडे सिनेमा लक्ष वेधतो. ज्याप्रकारे हिंदू धर्मात सती जाणे, बालविवाह अशा परंपरा बंद झाल्या तश्या मुस्लीम धर्मातील ट्रिपल तलाक बद्दल आम्ही विचारपूर्वक भाष्य केले आहे. या तलाकमुळे स्त्रीची होणारी वेदना आम्ही दर्शवली आहे.

Halal Upcoming Marathi Movie...

सिनेमाच्या कथानकाविषयी Shivaji Patil सांगतात की, एका ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब मिस्लीम कुटुंबाची ही गोष्ट आहे. कुटुंबात तीन मुली आहेत, ज्यातल्या मोठ्या मुलीला तलाकचा सामना करावा लागतो तेव्हा तिच्यावर आणि कुटुंबावर काय परिणाम होतो हे दाखवण्यात आले आहे. सिनेमात Pritam Kagne हिने मुख्य नायिकेची भूमिका लीलया पेलली आहे, तिच्यासोबत Priyadarshan Jadhav, Chinmay Mandlekar, Vijay Chavhan यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मराठी सिनेमाच्या विषयातील नाविन्य आणि संवेदनशील अभिनय यासाठी प्रत्येक मराठी प्रेक्षकाने Halal हा सिनेमा नक्की बघावा.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

हलाल चे बीज गावातच मिळाले – शिवाजी लोटन पाटील

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.