Heart Touching Song in Aapla Manus Marathi Movie…
“तू खुपच छान गातेस… मी तुझ आजवरच प्रत्येक गाणं ऐकलंय…गोड.. पहिल्याच ओळीत मनाल भिडणार अस तुझ गाण असतं”. ‘आपला मानूस’ नाना पाटेकरांच्या या गौरोद्गाराने मधुरा कुंभारचे गायन कौशल्य अधोरेखित केले. नानांसमोर गाणं एक आव्हान होंत व मधुराने हे आव्हान लिलया पेलत आपला बेस्ट परफॉर्न्स देत नानांसह जजेसची दाद मिळविली. सूर नवा ध्यास नवाचा नुकताच पार पडलेला हा भाग आपला मानूस चित्रपटाच्या टीममुळे विशेष ठरला…….
आपल्या अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारं, सामाजिक कार्यातून सर्वसामन्यांच्या मनावर राज्य करणारं, नटसम्राट, आपला मानूस अस व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात नाना पाटेकर.. नाना पाटेकर यांच्यासह सुमित राघवन, इरावती हर्शे यांची भूमिका असलेल्या आपला मानूस हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चीला जात आहे. विशेष म्हणजे अजय देवगण यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. सतिश राजवाडे यांचे दिग्दर्शन आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर हजेरी लावली. त्यात नाना पाटेकर यांचाही सहभाग होता. नाना असल्याने हा भाग सर्वांसाठी स्पेशल होता.. अशा या भागात मधुराने आशा भोसले यांच्या आवाजातील गाण अंत्यत सुरात, लयात, व अत्यंत प्रभावीपणे सादर केलं. विशेष म्हणजे तिचा घसा बसलेला असताना.. यावर मात करून तीने उत्कृष्ट गाण सादर केलं. नाना पाटेकरांच्या मनाला हे गाण भिडलं आणि त्यांनी मधुराचं भरभरून कौतुक केलं.
कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा हा शो सुरू झाल्यापासून मधुरा कुंभारच्या आवाजाच्या बाबतीत सर्वांना उत्सुकता होती. आपल्या आवाजाने अनेक गाणी स्वरबद्ध करून मधुराने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात वेगवेगळ्या शैलीत गावून मधुराने जजेससह प्रेक्षकांना थक्क केले आहे. लावणी, रोमँटीक, वेस्टर्न, सैराटच गावरान गाण अशा विविध ढंगातील गाण्यांना मधुराने आपल्या मधुर आवाजात सादर करून प्रत्येक वेळी जजेससची दाद मिळविली आहे.
सामान्यांमध्ये क्रेझ
तिच्या आवाजाची क्रेझ सर्वसामान्यांमध्ये वाढतच आहे. नागपूरमधील नववर्षाच्या पूर्वसंध्येला तिचा लाईव्ह शो विशेष गाजला होता. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आवाज, कौशल्य व मेहनतीच्या जोरावर यंदाचा सूर नवा ध्यास नवाचा किताब मधुरा जिंकेल अशी अपेक्षा सर्वसामन्य प्रेक्षक व्यक्त करीत आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0