Hrudayantar Movie | Review 3/5


हृद्यस्पर्शी : Hrudayantar…

Bollywood च्या प्रसिद्ध Fashion Designer Vikram Phadnisचा दिग्दर्शनातला पहिला प्रयत्न Hrudayantar अनेक उत्सुकता घेऊन आला आहे. सिनेमाची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती Vikram Phadnis यांनीच केली आहे. Hrudayantar सिनेमाची गोष्ट समायरा (Mukta Barve) आणि शेखर (Subodh Bhave) यांच्या वैवाहिक नातेसंबधावर आधारित आहे. त्यांच्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्या 12 वर्षात आपण एकत्र का राहतोय हाच प्रश्न त्यांना पडला आहे. प्रेम, मैत्री की तडजोड…याचं उत्तर ते शोधताना दिसतात. कारण शेखर हा Hotelier आहे. आपल्या कामात अतिशय Busy असल्यामुळे तो त्याच्या Family ला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तर दुसऱ्या बाजूला समायरा देखील एका Advertisement Company मध्ये Job करते आहे. परंतु नोकरी करत असताना दोन मुलींची आई म्हणून देखील जबाबदारी पार पाडत असतांना तिची तारेवरची कसरत होत असते.

Watch Marathi, Hindi Movie Review in Marathi on CafeMarathi App & Website

शेखरच्या वेळ न देण्याच्या कारणामुळे अखेर एका वळणावर दोघही वेगळे होण्याचा निर्णय घेतात त्याची अगदी कायदेशीर सुरुवात देखील होते. पण त्याच वेळी त्यांची मोठी मुलगी नित्या जी १० वर्षांची आहे तिला Blood Cancer होतो. तिथपासून नवरा बायकोच्या नात्यातील Hrudayantar चा खरा प्रवास सुरु होतो.

Ash (Sonali Anand (Khare) हिने देखील खूप चांगली कामगिरी बजावली आहे. ती शेखर आणि समायराची खूप चांगली मैत्रीण दाखवली आहे. Nitya च्या आजारपणामुळे घर अगदी शांत होऊन जातं आणि त्या प्रत्येकवेळी Ash ती वेळ अगदी चांगली सांभाळून घेते. Nitya च्या आजारपणाचा शेखर आणि समायराच्या नात्यावर काय परिणाम होतो? ते दोघे एकत्र येतात की वेगळे होतात यासाठी तुम्हाला Hrudayantar चित्रपट पहावा लागेल.

Vikram Phadnis हे Bollywood मधलं अगदी नावाजलेलं नाव त्यामुळे Hindi सिनेसृष्टीतील Shiamak Davar, Hrithik Roshan, Farah Khan, Maniesh Paul या कलाकारांची वर्णी यामध्ये लागलेली आहे. पण त्याचा सिनेमाला फारसा काही फायदा झालेला नाही. दिग्दर्शनातील Vikram Phadnis यांचा पहिला प्रयत्न तसा चांगला जमून आला आहे. Vikram Phadnis Bollywood मध्ये अधिक रुळले असल्याने सिनेमाचे लोकेशन चकाचक दिसून येत होते. विशेषतः कलाकारांचे कपडे. एक परिपक्व आईची भूमिका Mukta Barve ने चपखल साकारली आहे. तिच्यातील परिपक्व अभिनयाची चुणूक यातून दिसून आली आहे.

तिच्या वयात तिने अशी भूमिका साकारणे तसे Challenging आहे असंच म्हणावे लागेल. Subodh Bhave एक Perfect Businessman दिसून येतो, परंतु आता Subodh ला अशा अनेक भूमिकेतून आपण यापूर्वी पाहिले असल्याने त्यात नवीन काही वाटत नाही, तरी त्याच्या वाटयाला आलेली भूमिका त्याने उत्तम केली आहे. दोन्ही मुलींनी चांगली कामं केली आहेत. सिनेमातील गाणी सिनेमाला अनुसरून आहेत… आयुष्यात सुखाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा दुख: येते आणि त्यातून सावरता सावरता आयुष्य कसे जगले पाहिजे हे Hrudayantar सिनेमा सांगतो. एकवेळ बघायला हरकत नाही असा हा सिनेमा आहे.

CafeMarathi कडून या सिनेमाला तीन टाळ्या  ??????

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Hrudayantar Movie | Review 3/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.