A Huge Response to Bhay Marathi Movie…
मराठी सिने-सृष्टीमध्ये सातासमुद्रा पार गेलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला थरारक चित्रपट म्हणजे “Bhay”… Abhijeet Khandkekar, Smita Gondkar, Sanskruti Balgude यांसारखी तगडी कलाकार मंडळी असलेला हा चित्रपट दि. 2 मार्च रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळत आहे. चित्रपट समिक्षकांकडून देखील “Bhay” या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.
भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात राहिल्याने आपलं उर्वरित शरीरसुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बऱ्याचदा वाटत राहतं. या आपल्या कल्पनाशक्तीच्या खेळात वेळीच सावरलो नाही तर काय होऊ शकतं हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे…”Bhay”. अशा वेगळ्याच संकल्पनेवर आधारित चित्रपटला प्रेक्षक ही गर्दी करताना दिसत आहेत.
नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर दुबईमध्ये पार पडला. या प्रिमियरला दुबईस्थित मराठीजनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी, दि. 23 फेब्रुवारीला दुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये संपन्न झालेल्या या Show ला दुबईच्या स्थानिक कलाकारांनीसुद्धा आवर्जून हजेरी लावली होती.
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री Smita Gondkar CafeMarathi च्या ऑफिसमध्ये आली होती. तिने CafeMarathi च्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला आणि खूप मज्जा आणि गप्पा मारल्या. या चित्रपटामध्ये विशेष गोष्ट ही आहे की जे नेहमी कॅमेराच्या मागे राहून चित्रपट कसा चांगला बनवता येईल हे बघत असतात ते म्हणजे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे या चित्रपटामध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे त्यांना या भूमिकेत बघण्याचा अनुभव नक्कीच वेगळा आणि छान असणार आहे.
असा भन्नाट आणि थरारक सिनेमा बघायला नक्की जा. त्यासाठी तुम्ही Paytm वर ही तुम्ही Tickets Book करू शकता आणि ५०% कॅशबॅक मिळवू शकता. तिकिटे बुक करण्यासाठी क्लिक करा > http://m.p-y.tm/pbhy
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0