“इंदधनू” या गोड गाण्याची सर्वांना मेजवानी


मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला असे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट भेटीला येणारच आहे. या सिनेमाचे पोस्टर, दोन अफलातून टीझर, भन्नाट डायलॉगने भरलेला ट्रेलर आणि काही दिवसांपूर्वीच ‘गोमू संगतीने’ गाण्याने सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचवली खरी… आणि आज ‘इंद्रधनू’ हे गोड गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे वैदेही परशुरामी आणि सुबोध भावे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात वैदेहीच्या चेहऱ्यावरील ते गोड हावभाव, सुबोध भावे यांनी डॉ. घाणेकर यांची तीच स्टाईल, लकब नीट उचलून धरली आहे.

या सिनेमात वैदेही सकारात असलेली भूमिका म्हणजे डॉ. घाणेकर यांच्या आयुष्यातील महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. ‘आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी, सभोवती नसे कुणी लाजते मनात मी…’ अशी गोड शब्दरचना असलेले गाणे शरयू दाते हिने गायले आहे तर अभिजित शिरीष देशपांडे यांनी शब्दबद्द केले आहे. या गाण्यात वैदेही सायकलवरून येताना गालात हळूच हसताना दिसत आहे, आणि पूर्णपणे सुबोध (काशिनाथ घाणेकर) यांच्याबद्दल विचार करताना दिसते. आणि त्यातून तिचे प्रेम अगदी सहजपणे जाहीर होताना दिसतय. वैदेहीचे सुबोध (डॉ. काशिनाथ घाणेकर) यांच्याविषयीचे एकतर्फी प्रेम अगदी सहज कळून जाते कारण गाण्याचे चित्रीकरण जरी या काळात झाले असले तरी त्यातील तो गोडवा, नाजूक अदा, सुबोध भावेंनी डॉ. घाणेकर यांची उचलून धरलेली लकब अगदी हुबेहूब दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अगदी त्या काळात हरवून गेल्याचा भास होतो. या गाण्याविषयी बोलताना वैदेहीने सांगितले की, “त्या काळातला साधेपणा, निरागसपणा, त्यांच्या वयाचं भान ठेवणे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे गाणं बनवलं आहे, आणि ते खूप छान लिहिलं आहे, खूप गोड आवाज या गाण्याला मिळाला आहे शरयू दातेचा त्यामुळे खूपच मस्त झालायं गाणं.” या गाण्याचे शूट करताना वापरण्यात आलेली सायकलही त्यावेळची वाटावी म्हणून अगदी पुरुषांची सायकल वैदेहीने चालवली होती, आणि ती चालवताना पडणं, तोल सांभाळणं खूप मजेदार होतं असं ही तिने नमूद केलं.

या गाण्याने सिनेमाविषयीची सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे दिवाळी आणि हा सिनेमा म्हणजे दुग्धशर्करा योग जुळवून आणणार आहे हे नक्की. येत्या 8 नोव्हेंबरला हा सिनेमाचा सर्वांच्या भेटीला येणार आहे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
1
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

“इंदधनू” या गोड गाण्याची सर्वांना मेजवानी

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.