Insane Channel for Amusing News!
विनोद आणि मनोरंजन हा संयोजन नेहमीच प्रेक्षकांना आवडला आहे. या दोन गोष्टींची गुंतवणूक करण्यात अनेक डिजिटल मिडिया पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच भावणारी अशी ही कॉमेडीची मेजवानी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यात भाषेचे इतके वेगवेगळे उच्चारण आहेत आणि असे ग्रामीण भागातले उच्चार विनोदी ढंगात ऐकायला खूप मस्त वाटतात. अशीच काहीशी मजेदार कल्पना घेऊन कॅफे मराठीचे संस्थापक निखिल रायबोले यांनी गावाकडच्या बातम्यांचा चॅनेल ही उत्कृष्ट कल्पना सुरु केली.
गावाकडच्या बातम्यांचा चॅनेल हा कॅफेमराठीच्या सोशियल मिडिया वर झळकणारा एक विनोदी कार्यक्रम आहे. कॅफे मराठीसोबत एकनिष्ठेने निगडीत असलेले राजू जगताप म्हणजेच तुमचे राजू रिपोर्टर या कार्याक्रमाचे संचालक आहेत. गावाकडच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शहरात येऊन तिथल्या प्रसिद्ध असलेल्या गोष्टी जाणून लोकांपर्यंत पोहोचवतात. शिवाय ते मराठी चित्रपटश्रुष्टीतल्या कलाकारांची मुलाखतही घेतात. सर्वप्रथम या शोवर सोबत चित्रपटाची नायिका मोनालीसा बागल आपल्याला दिसली होती. त्या नंतर “माइम थ्रू टाइम” या युट्युब व्हिडियोमधुन व्हायरल झालेली नम्रता गायकवाड यांच्या सोबत राजू रेपोर्तर यांनी डांससुद्धा केला. इंटरनेट वर झळकणारे गावरान राजू रिपोर्टर आपल्या ग्रामीण भाषेने त्यांच्या प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. १ एप्रिल ’१८ या दिवशी जी.बी.सीचा टीझर पर्दार्षित झाला होता.
आता आपल्या गावापासून दूर ते आले आहेत मुंबई शहरात तिथल्या प्रसिद्ध असलेल्या जागा बघायला आणि तिथला वडा पाव चाखायला. म्हणजेच त्यांचे हल्लीच रिलीज झालेले व्हिडियो. वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारून त्यावर मुंबईकरांचे काय मत आहे हे जाणून त्यांच्याशी गप्पा मारताना ते आपल्याला दिसतील.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0