KunachaTari | कुणाचातरी | Marathi Short Film


नाटय हे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या जवळपासच घडत असते. परंतु एका creative माणसाची नजर त्याला Camera मध्ये कैद करू शकते. Sachin Bawane याला ते उमगलं आणि अशाच काही घटनांचा समावेश करत त्याने साकारली कुणाचा तरी(Kunachatari) ही short film सिनेमाच्या सर्व घटकांचा उत्तम वापर करत ही film साकारली. पाहता पाहता तुम्हाला विचार करायला लावणारी ही कलाकृती CaféMarathi आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

Kunachatari Short Film Maker Sachin Bawane यांनी CafeMarathi सोबत मांडलेले हे मनोगत !!!

Short Film म्हणजे Director Profile की Social Awareness?

माझ्या मते Short Film ही Director Profile आहे. बहुतांश Short Film या Social Awareness देखील करतात. पण प्रत्येक Short Film कडून Social Awareness ची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण असे कित्येक विषय आहेत ज्यांकडे या कारणामुळे दुर्लक्ष होत आहे.

Film चा विषय कसा सुचला ?

आपल्या आसपास रोज अनेक घटना घडत असतात चांगल्या व वाईट ही. रोज भांडण करणाऱ्या व्यक्ती पण काही कारणांसाठी एकत्र येतात एकजूट होतात या गोष्टीचे मला फार कुतूहल वाटायचे. यातूनच हा विषय सुचला.

विषय कुठपर्यंत पोहचला ?

या Film मुळे हा विषय देशांतर्गत होणाऱ्या विविध राज्यांतील अनेक Film Festival पर्यंत पोहचला आहे.

विषयसाठी Research केला होता का ?

खूपशा गोष्ठी आपणाला समाजातून आपल्या आसपास रोज घडणाऱ्या घटनेतूनच मिळतात. कुणाचातरी ही film आम्ही अशाच अनुभवातून साकारली आहे. ग्रामीण भागातच राहत असल्यामुळे यात मांडलेले बरेच किस्से हे आम्ही अनुभवले आहेत.

Message काय ?

राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान वा अवमान करणे फार मोठा गुन्हा आहे. तो आपल्या व अन्य कोणाच्या हातून होऊ न देण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या देशात अनेक जाती व धर्म आहेत. या जरी भिन्न असल्या, आपापसात जरी मतभेद असले तरी ते आपल्या देशासाठी एकजूट होतात. मग ती व्यक्ती मोठी असो वा छोटी. या film चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या प्रत्येक Frame मधून आपण Message घेऊ शकतो.

Shooting Experience कसा होता ?

माझासाठी प्रत्येक film चा अनुभव हा नवीन व वेगळाच असतो. मात्र या film चा अनुभव खूपच भन्नाट होता. story सुचल्यापासून पटकथेला सुरवात करेपर्यंत आठ महिने हा विषय तसाच रेंगाळत राहिला. माझा मित्र Swapnil याने film ची पटकथा लिहली. Storyboard मुळे प्रत्येक frame आधीच Final असल्याने तसे Locations शोधण्यासाठी खूप वेळ गेला. हवी तशी Locations सापडली पण त्यासाठी आम्हाला सहा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन Shooting करावं लागलं.

यातील एक अनुभव असा की शिक्षीत लोकांपेक्षा अशिक्षित लोकांनी खूप मदत केली. ध्वजवंदनाच्या Shoot साठी आम्हाला शाळा हवी होती. जवळपास तालुक्यातील सगळ्या शाळा आम्ही फिरलो. जी शाळा आवडते त्या शाळेतून Shooting ला नकार यायचा, “तुमच्यामुळे आमच्या शाळेची बदनामी होईल, तुमचा विषय खूप Sensitive आहे.” अशी उत्तरे देखील मिळाली.

यातील आणखी एक मजेशीर किस्सा म्हणजे Casting. Film Budget खूपचं कमी असल्यामुळे सगळ्याचं गोष्टींमध्ये मर्यादा होत्या. मुलं शोधण्यासाठी खूप फिरावं लागलं प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या विनवण्या कराव्या लागल्या. “कसल्यापन नादाला लावू नका आमच्या पोरांना, तुमाला काय काम-धंदा हाय का नाय” त्यांचाकडून ही अशी उत्तरे मिळाली. त्यातून जी मुलं तयार होत ती Role साठी Fit नसायची. त्या काळात फासेपारध्यांचा वावर वाढल्याने काही जणांनी आम्हाला फासेपारधी समजून जाब देखील विचारला. चारही मुलं आम्हाला आमच्याच गावात सापडली ती पण Perfect.

Muslim character चे घर शोधायलाही खूप वण-वण करावी लागली. शेवटी एक घर आवडलं पण ते गेली सात वर्ष बंद असल्याने मोडकळीस आलेले होते. घुशिनी पोकरलेले. आतमध्ये फक्त अडगळ आणि मातीचं-माती. आम्ही त्याचं घरात Shoot करायचं ठरवलं. कोणतेही काम करायची तयारी असणाऱ्या आमच्या Team मुळे आम्ही ते घर दोन दिवसात स्वच्छ केले. त्याचे रंगकाम किरकोळ डागडुजी केली. Property गोळा केली.

सगळ्या Team च्या अथक परिश्रमाने, मित्रांच्या मदतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने film चे Shooting 15 Aug 2015 रोजी सुरु झाले.Chicken Center वरील Chicken कापतानाचा एक Scene होता. पण श्रावण महिना असल्याने Chicken मिळवणे हीच एक मोठी समस्या होऊन बसली होती.

एका Scene वेळी तर मुलांची Hand Property Car मध्ये असतानाच Car Lock झाली. Car ची चावीपण Car मध्येच, ते lock काढण्यासाठी करावी लागलेली खटपट फार गमतीशीर होती. अशा गोष्ठी बरेच काही शिकवुनही गेल्या. Kunachatari X-Arm या film चा Premier 26 Jan 2016 रोजी Kolhapur येथे घेण्यात आला.

Comments 3

Leave a Reply

KunachaTari | कुणाचातरी | Marathi Short Film

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.