गावातल्या गंमती जमती बघा, लँड १८५७..सिनेमातून


‘Land 1857’ Marathi Movie Coming Soon
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजवर अनेक सिनेमे येऊन गेले, पण शेती व्यवसाय सोडून शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर भाष्य करणारा सिनेमा आजवर नाही आला. विजयालक्ष्मी फिल्म प्रॉडक्शन निर्मिती संस्थे अंतर्गत, विजयालक्ष्मी निर्मित, सुधीर दिग्दर्शित ‘लँड १८५७’ नावाचा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
निर्मात्या विजयालक्ष्मी यांनी यापूर्वी दोन शॉर्ट फिल्मची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्या दोन्ही शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. या सिनेमाबाबत त्या सांगतात की, जेव्हा या सिनेमाची गोष्ट आम्ही ऐकली तेव्हाच यावर सिनेमा करायचे ठरवले. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी लगत आणि घरालगत मोठा महामार्ग तयार होण्याची अधिसूचना आल्याने सर्व गावकरी आनंदी होतात आणि शेताला व घराला मोठी रक्कम मिळणार म्हणून अनेक स्वप्न रंगवू लागतात…अशी मजेशीर गोष्ट या सिनेमाची आहे. पुढे काय होते हे सिनेमात पाहण्यासारखे आहे.
सिनेमात जयंत सावरकर, अनिल नगरकर, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, रुपाली कृष्णराव, राहुल फलटणकर, विशाल सकट, मानिणी दुर्गे, सागर सुरवदे आणि सुरज यादव यांच्या प्रमुख भूमिका असून. पार्श्वसंगीत रोहित नागभिडे, संगीत पंकज पडघम आणि अभिजित बारटक्के तर सहनिर्माते युवराज कुंभार आहेत. सिनेमात एकूण दोन गाणी आहेत. जी आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर यांनी गायली आहेत. विनोदी अंगाने जाणाऱ्या या सिनेमाच्या गोष्टीत प्रेमी युगलाचे देखील उपकथानक आहे. म्हणजे संपूर्ण मनोरजंन यात असणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तेव्हा सज्ज रहा हसायला.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

गावातल्या गंमती जमती बघा, लँड १८५७..सिनेमातून

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.