महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८ दिमाखदार सोहळा संपन्न !


Maharashtracha Lokpriya Brand 2018 Celebrated

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये मराठी उद्योजकांचा ऐतिहासिक कार्यक्रम !

भारत भरातून ८०० हुन अधिक उद्योजकांची उपस्थिती !

२२ प्रस्थापित ब्रँड व १२ प्रॉमिसिंग ब्रँडचा झाला सन्मान !

“विनर्स अर्थसंकेत कन्सल्टन्सी” या नवीन गुंतवणूक विषयक संस्थेची घोषणा !

२३ जून २०१८ रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथील इंटरनॅशनल कॉन्व्हेंशनल हॉलमध्ये मराठी उद्योजकांचा ऐतिहासिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राचा महासन्मान – महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८’ सोहळा दिमाखदाररीत्या संपन्न झाला !

विकोचे श्री. संजीव पेंढारकर, रूरल रिलेशन्सचे श्री. प्रदीप लोखंडे, चितळे डेअरीचे श्री. गिरीश चितळे, सह्याद्री फार्म्सचे श्री. विलास शिंदे, विनर्सचे श्री. शशिकांत खामकर, भागिरथी ग्रुपचे श्री. मनोहर सकपाळ, हावरे ग्रुपचे श्री. अमित हावरे, माधवबागचे श्री. रोहित साने, क्रिस्टल ग्रुपच्या सौ. नीता प्रसाद लाड, पनवेलकर ग्रुपचे श्री. राहुल पनवेलकर, राजेश सिल्व्हर्सचे श्री. राजेंद्र शेट्ये, शाश्वत ग्रुपचे श्री. लक्ष्मण विसपुते, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे श्री. विश्वनाथ पेठे, BSE चे स्ट्रॅटेजी हेड व  बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शंकर जाधव व BSE SME चे हेड श्री. अजय ठाकूर, मराठी अभिमान गीत साकारणारे श्री. कौशल इनामदार, जेष्ठ अभिनेता श्री. पंकज विष्णू इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन व अनुभव एक नवीन ऊर्जा देऊन गेले.

डायमेन्शन्स ऍडव्हर्टायझिंगच्या वीणा बेडेकर, हॉटेल बल्लाळेश्वरचे श्री. विजय गावडे, ब्लू मस्टँग क्रिएशन्सचे श्री. अशोक सुभेदार व आरती सुभेदार, कॅप्टन निलेश हॉलीडेजचे कॅप्टन निलेश गायकवाड, होमेकचे श्री. अशोक नाईक, ईशा टूर्सचे श्री. आत्माराम परब, पवित्र विवाह डॉट कॉमचे श्री. ऋषिकेश कदम, युकेज रिसॉर्टचे श्री. संतोष पाटील, विद्या विकास एज्युकेशनचे श्री. विकास राऊत , आर के होम मेड मॉकटेलचे श्री. हृदय लाड व रामचंद्र बांगर व सेव्हन पी इन्फो मिडियाचे श्री. केतन माने यांनी भविष्यात मोठा पल्ला गाठण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘आवाज संगीत विद्यालयाच्या’ गायिकांच्या गणेश वंदनेने झाली. ‘कॅफे मराठी’च्या अतरंगी स्टॅन्ड अप कॉमेडियननी कार्यक्रमात रंगत भरली. श्री. किरण खोत यांच्या सूत्र संचालन सर्वांचे ह्रदय जिंकून गेले. त्याच्या चारोळ्या, कविता व विनोदाने उपस्थितांमध्ये चैतन्य टिकून राहिले.  अर्थसंकेतचे संस्थापक श्री. अमित बागवे यांनी महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड व सम्पुर्ण उपक्रमातील अनुभवाची माहिती दिली. अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ. रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.

जी फाईव्ह वेब सर्व्हिसेसचे श्री. तुषार भगत यांनी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेबद्दल बोलतानाच मराठी उद्योग जगताचीही जाणीव करून दिली. आपल्या कामातून सातत्य, क्वालिटी याचा व्यवसायात नियमित वापर करणे म्हणजे ब्रँड असे सांगितले. मराठी उद्योजक जगभर पोहोचत आहेत हि अभिमानाची गरज आहे. हे सर्व मराठी ब्रँड स्टॉक एक्स्चेंज मध्ये लवकरच नोंदणी करतील अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

बी एस ई एस एम ई चे प्रमुख श्री. अजय ठाकूर यांनी लघु व मध्यम उद्योगांनी शेअर बाजारात नोंदणी करून भांडवल उभारणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले.

बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री. शंकर जाधव यांनी भांडवल उभारणी व ब्रॅंडिंग या विषयावर मार्गदर्शन केले. मराठी उद्योजकांनी आपला व्यवसाय जगभर वाढवावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

लालबागचा राजा गणोशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री, बाळासाहेब कांबळे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली व राजाचा इतिहास थोडक्यात उलगडून सांगितला. अर्थसंकेत करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या व मंडळ नेहमीच अर्थसंकेतच्या पाठीशी राहील असे सांगितले.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीचे सदस्य श्री. प्रशांत केळस्कर यांनी सर्व मान्यवरांना लालबागच्या राजाची प्रतिमा भेट दिली.

वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मिलींद लांजेवार यांनी मराठी उद्योग जगतातील कमतरता दाखविताना अर्थसंकेत सर्व उद्योजकांना एका व्यसपीठावर आणून खुप मोठे काम करीत आहे असे मत मांडले. फक्त भारतामध्ये जी एस टी कौन्सिल असून त्यामुळे वस्तू व सेवा कर संबंधित अनेक प्रश्न सोडविण्यात मदत झाली आहे. अर्थसंकेतचा पुढील कार्यक्रम न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजला व्हावा अशी शुभेच्छा त्यांनी दिली.

विनर्स लाईफ ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीचे प्रमुख श्री. शशिकांत खामकर यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी दुसऱ्यांना देण्याची भावना असणे आवश्यक आहे असे सांगितले. आपल्याला खुप मोठे व्हायचे असेल तर मुळांवर काम करणे आवश्यक आहे. अंतर्मनाचा आवाज ऐकणे खुप आवश्यक आहे. अध्यात्मिक शक्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. विनर्स व अर्थसंकेत एकत्र येऊन महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचे काम नक्की करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राशी माझे घनिष्ठ संबंध आहेत असे म्हणत मराठी अभिमान गीताचे संगीतकार श्री. कौशल इनामदार यांनी उपस्थितांची मने जिंकली. कुठलाही समाज पुढे जाण्यासाठी त्याची किल्ली आर्थिक जगताकडे असते. मराठी अभिमान गीतात ४५० गायक गायले आहेत. मराठीतील सर्वात भव्य असे ते गाणे झाले. एफ एम रेडिओच्या जॉकीने मराठी गाण्यांना डाऊनमार्केट म्हटले म्हणून इतके भव्य गाणे निर्माण केले असे ते म्हणाले. उद्योग व्यवसाय विषयक शब्दांना मराठीमध्ये नकारात्मक सुर आहे, तो बदलणे आवश्यक आहे. भाषा वाचायची असेल तर तिचा वापर वाढविला पाहिजे असे डोळ्यात अंजन घालून त्यांनी भाषणाची सांगता केली.

ज्येष्ठ अभिनेता पंकज विष्णू यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी उद्योगजगता बद्दल गौरवोद्गार काढले. आता आमची सर्वत्र शाखा आहे असे मराठी उद्योजक म्हणत आहेत. अर्थसंकेत मधील “सं” लाल अक्षरात असण्याचे कारण म्हणजे ती संधी आहे व सर्व उद्योजकांनी हि संधी घेतली पाहिजे. आज स्टॉक एक्स्चेंज मराठी माणसांनी काबीज केले आहे असे वाटते.

विनर्स शशिकांत खामकर व अर्थसंकेत यांनी एकत्र येऊन “विनर्स अर्थसंकेत कन्सल्टन्सी” या नवीन गुंतवणूक विषयक संस्थेची घोषणा केली. सर्व प्रकारची गुंतवणूक सेवा, कर विषयक मार्गदर्शन तसेच व्यवसाय विषयक मार्गदर्शन या संस्थेद्वारे करण्यात येणार आहे. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, इन्शुरन्स, मेडिक्लेम व इतर गुंतवणूक सेवा पुरविली जाणार आहे.

अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ. रचना लचके बागवे यांचे वडील श्री. संतोष लचके यांनी अर्थसंकेतच्या कार्याची दखल घेत रुपये एक लाखाची जाहीर देणगी दिली.

‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ या विभागात व्ही पी बेडेकर, चितळे डेअरी, विको लॅबोरेटरी, खो – गो … अहिल्या आयुर्वेदिक औषधालय, सह्याद्री फार्म्स, माधवबाग – वैद्य साने आयुर्वेद लॅब प्रायव्हेट लिमिटेड, टी जे एस बी सहकारी बँक यांचा सन्मान करण्यात आला.

‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ या विभागात भागीरथी ग्रुप, हावरे ग्रुप, पनवेलकर ग्रुप, राजेश सिल्व्हर्स, क्रिस्टल ग्रुप, वामन हरी पेठे ज्वेलर्स, सीड इन्फोटेक, शाश्वत ग्रुप, तळवलकर जिम, फ्रँटेज मिडिया यांचा सन्मान करण्यात आला. ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’ या विभागात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, रूरल रिलेशन्स, पितांबरी, अँजेलोज व्ही एन सी टी व्हेंचर्स यांचा सन्मान करण्यात आला. प्रॉमिसिंग ब्रँड मध्ये ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ या विभागात हॉटेल बल्लाळेश्वर, कॅप्टन निलेश हॉलिडेज यांचा सन्मान करण्यात आला. ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ या विभागात ब्लू मस्टँग क्रिएशन्स,डायमेन्शन्स ऍडव्हर्टीयझिंग, युकेज रिसॉर्ट, आर के होम मेड मॉकटेल, सेव्हन पी इन्फो मिडिया यांचा सन्मान करण्यात आला. ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’ या विभागात विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, ईशा टूर्स, होमेक डेकोर्स, पवित्र विवाह डॉट कॉम, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडेमी यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. तुषार भगत यांच्या जी फाईव्ह वेब सर्व्हिसेसने महाब्रँडची वेबसाईट बनविली तर शी महेश कारंडे यांच्या निव्हस्टोन – ब्रँड क्रिएटर व क्युरेटर या संस्थेने सर्व डिझाईन बनविले. शी महेश कारंडे यांनी ट्रॉफी म्हणजेच सन्मान चिन्हाचे डिझाईन बनविले.  बी एस ई एस एम ई हे एक्स्चेंज पार्टनर होते तर विनर्स शशिकांत खामकर हे प्लॅटिनम स्पॉन्सर व एफ एम मॅजिक हे रेडिओ पार्टनर होते .

मुंबईतील जनसामान्यांचे लाडके एम इंडिकेटर, पंढरपूर येथील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र पंढरी संचार, मुंबई येथील स्पिक आऊट, फॉरएव्हर न्यूज, ठाणे येथील सुप्रसिद्ध न्यूज चॅनेल ठाणे वर्तमान, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, सोलापूर येथील सुप्रसिद्ध यस न्यूज, विनर्स एक्स्प्रेस मॅगझीन हे सर्व आउटरीच पार्टनर होते.

प्लॅनेट मराठी हे ऑनलाईन पार्टनर होते तर कॅफे मराठी इंटरटेन्मेन्ट पार्टनर होते. सोहम हॉलिडेज, वास्तूपूर्ती ग्रुप, सी के पी चेंबर ऑफ कॉमर्स, माऊली असोसिएट, जे फॉर ई, उद्यमी महाराष्ट्र यांचे विशेष सहकार्य लाभले.

स्किल सीखो डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर होते. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ / ९९३००२६०२०

“अंतर्मनाचा आवाज ऐकणे अत्यावश्यक” – श्री. शशिकांत खामकर !

“भाषा वाचायची असेल तर तिचा वापर वाढविला पाहिजे” – श्री. कौशल इनामदार !

“स्टॉक एक्स्चेंज मराठी माणसांनी काबीज केले आहे असे वाटते” – श्री. पंकज विष्णू !

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८ दिमाखदार सोहळा संपन्न !

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.