‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८’ वेबसाईट उदघाटन सोहळा संपन्न !


‘Maharashtracha lokpriya brand 2018’ website inauguration
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक इंजिनिअर डॉ. माधवराव भिडे व डॉ. इरावती भिडे, कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार,  बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे श्री. शंकर जाधव, विकोचे संजीव पेंढारकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री. शंतनू भडकमकर, विनर्स शशिकांत खामकर कडून सौ. ज्योती खामकर यांच्या विशेष उपस्थितीत अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८ वेबसाईट उदघाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांनी आपल्या आवडत्या ब्रँडला मतदान करून वेबसाईटचे उदघाटन झाले.
महाराष्ट्रातील २२ दिग्गज व प्रस्थापित ब्रँड व ११ उभरते ब्रँडसाठी होणार लोकप्रियतेचे मतदान !
दिग्गज व प्रस्थापित ब्रँड मध्ये पितांबरी, विको, माधवबाग, फ्रँटेज मिडिया, वामन हरी पेठे ज्वेलर्स, तळवलकर्स जिम, रूरल रिलेशन्स, खो गो, सेंट अँजेलोज व्ही एन सी टी व्हेंचर्स, हावरे ग्रुप, चितळे डेअरी, बेडेकर मसाले, पनवेलकर्स ग्रुप, निर्लेप, राजेश सिल्व्हर्स, सीड इन्फोटेक, भागिरथी ट्रान्स कॉर्प, शाश्वत ग्रुप, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, टी जे एस बी सहकारी बँक, सह्याद्री फार्म्स, क्रिस्टल ग्रुप
उभरते ब्रँड मध्ये ब्लु मत्सन्ग प्रोडक्शन, पवित्र विवाह.कॉम, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडेमी, कॅप्टन निलेश गायकवाड टूर्स, ईशा टूर्स, डायमेन्शन्स ऍडव्हर्टायझिंग, बल्लाळेश्वर मिसळ, यु के रिसॉर्ट खोपोली, होमेक, सेव्हन पी मिडिया, विकास कॉलेज हे ब्रँड सहभागी आहेत.
अर्थसंकेतचे संस्थापक श्री. अमित बागवे, सह संस्थपक सौ. रचना बागवे, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँडच्या ऑनलाईन व्होटिंगसाठी वेबसाईट बनविणारे जी फाईव्ह या संस्थेचे श्री. तुषार भगत,  महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह काम सांभाळणारे नीव स्टोनचे श्री. महेश कारंडे, मनसेचे उपाध्यक्ष श्री. अरविंद गावडे, पवित्र विवाह डॉट कॉमचे श्री. ऋषिकेश कदम, फ्रँटेज मिडियाचे श्री. विलास पारकर, इशा टूर्सचे श्री. ,आत्माराम परब, होमेकचे अशोक नाईक, डायमेन्शन्स ऍडव्हरटाजिंगच्या सौ. वीणा बेडेकर, हॉटेल बल्लाळेश्वरचे श्री. विजय गावडे, सेव्हन पी मिडियाचे श्री. केतन माने व इतर मान्यवर उपस्थित होते
श्री. अमित बागवे यांनी महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यक्रमाची संकल्पना व माहिती दिली. श्री. तुषार भगत यांनी महाब्रँड वेबसाईटची व मतदान करण्यासंबंधी माहिती दिली तसेच श्री. महेश कारंडे यांनी ब्रॅंडिंगचे महत्व या विषयवार मार्गदर्शन केले, सौ. रचना बागवे यांनी आभार प्रदर्शन केले. विकोचे श्री. संजीव पेंढारकर यांनी विको कंपनीचा ब्रँड कसा उभा राहिला याबद्दल माहिती दिली. तिसरी पिढी व जवळपास ६५ वर्ष विको हा ब्रँड ग्राहकांना सेवा देत आहे. ६५ वर्षांपासून विको हा जागतिक दर्जाची उत्पादने बनवित आहे. परदेशी ग्राहक सुद्धा विकोची उत्पादने वापरतात या संबंधित किस्सा त्यांनी सांगितला.
श्री. माधवराव भिडे यांनी ब्रॅंडिंगचे महत्त्व अधोरेखित केले व अर्थसंकेतच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी खुप मोठे काम सुरु असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. श्री. शंतनू भडकमकर यांनी उद्योजक बनण्याची उर्मी असणे तसेच व्यवसायात जोखीम घेण्याची इच्छा पाहिजे असे मत मांडले. ब्रँड बनविणे कसे महत्त्वाचे आहे यावर विवेचन केले. कोणत्याही व्यवसायाची तीन वर्षे पूर्ण झाल्यावर त्या व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे असे ते म्हणाले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा, मशीन लर्निंग अशा बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
श्री. शंकर जाधव यांनी लघु व मध्यम उद्योजकांसाठी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून भांडवल उभारणी कशी करता येते यावर माहिती दिली तसेच ब्रँड व ब्रॅंडिंग हे व्यवसायासाठी अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. आज अनेक सेवा ह्या विनामूल्य उपलब्ध होत आहेत. आपण सुद्धा आपल्या व्यवसायाला अशा प्रकारे बनवू शकतो का यावर विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. नितीन पोतदार यांनी अर्थसंकेतच्या कार्याचा गौरव केला व मर्सिडीज कंपनीचे उदाहरण देऊन ब्रँड कसा असावा हे अगदी सोप्या भाषेत समजावले. तरुण उद्योजकांच्या पाठीशी नातेवाईकांनी उभे राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. आर्थिक साक्षरता हा विषय शाळेत शिकविला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. विविध सामाजिक कार्यक्रम होतात जसे कि मॅजेस्टिक गप्पा त्यात उद्योजकता व आर्थिक साक्षरता हे विषय सुद्धा आले पाहिजेत. मराठी उद्योजकांचे ब्रँडसुद्धा जगप्रसिद्ध असून जास्तीत उद्योजकांना ब्रॅंडिंगचे महत्त्व कळावे यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
बी एस ई एस एम ई हे टायटल स्पॉन्सर असून विनर्स शशिकांत खामकर हे प्लॅटिनम स्पॉन्सर व एफ एम मॅजिक हे रेडिओ पार्टनर आहेत. मुंबईतील जनसामान्यांचे लाडके एम इंडिकेटर, पंढरपूर येथील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र पंढरी संचार, मुंबई येथील स्पिक आऊट, फॉरएव्हर न्यूज, ठाणे येथील सुप्रसिद्ध न्यूज चॅनेल ठाणे वर्तमान, ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका, सोलापूर येथील सुप्रसिद्ध यस न्यूज, विनर्स एक्स्प्रेस मॅगझीन हे सर्व आउटरीच पार्टनर आहेत.
प्लॅनेट मराठी हे ऑनलाईन पार्टनर आहेत तर कॅफे मराठी इंटरटेन्मेन्ट पार्टनर आहेत. सोहम हॉलिडेज, वास्तूपूर्ती ग्रुप व सी के पी चेंबर ऑफ कॉमर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्किल सीखो डॉट कॉम हे स्टार्ट अप पार्टनर आहेत. २२ जून २०१८ रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे अंतिम सोहळा संपन्न झाला. अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४९९२७९ / ९९३००२६०२०
“तरुण उद्योजकांच्या पाठीशी उभे राहा” : श्री. नितीन पोतदार
“६५ वर्षांपासून विको जागतिक दर्जाचा ब्रँड” : श्री. संजीव पेंढारकर
“बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरा” : श्री. शंतनू भडकमकर
“विनामूल्य सेवा देण्याचे गमक समजून घ्या” : श्री. शंकर जाधव
“मराठी उद्योजकांनी कोटीच्या कोटी रुपयांचे व्यवसाय उभे करावेत” : श्री. माधवराव भिडे

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०१८’ वेबसाईट उदघाटन सोहळा संपन्न !

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.