Majha Elgar Marathi Movie…
सिनेमा म्हणजे Larger than Life…आपल्या आसपास घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपण नेहमीच सिनेमात बघत आलोय. वास्तव आयुष्यात आपण निमूटपणे अन्याय आणि अत्याचार सहन करतो आणि फक्त बघतो. पण सिनेमात नायक-नायिका जेव्हा एखाद्या अन्यायकारक किंवा चुकीच्या गोष्टीविरुद्ध बंड पुकारतात किंवा विरोध करतात तेव्हा आपण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतो. कारण हेच की वास्तव आयुष्यात आपण ते करू शकत नाही इच्छा असूनही. म्हणून सिनेमात नायक-नायिका आपल्याला अधिक भावतात. अशाच भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची गोष्ट सांगणारा Majha Elgar (माझा एल्गार) हा मराठी सिनेमा १० नोव्हेंबर पासून तुमच्या भेटीला येतो आहे.
सिनेमाची नायिका Aishwarya Rajesh, सिनेमाबद्दल सांगते की, सिनेमात माझी मुक्ता नावाच्या मुलीची भूमिका आहे. एका छोटयाश्या गावात राहणारी ही मुक्ता नावाच्या मुलीची ही गोष्ट आहे. तिच्या आयुष्यात एका नाट्यमय घटनेनंतर कसे तिचे जीवन बदलून जाते आणि यासाठी ती काय संघर्ष करते याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. Majha Elgar (माझा एल्गार) चित्रपटाचे निर्माते Sourabh Apte तर प्रस्तुतकर्ते Shrikant Apte असून. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन Milind Kamble आहे.
Sourabh Apte सांगतात कि. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून आम्ही माझा एल्गार या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट म्हणजे मनोरंजन हे जरी खरे असले तरी त्यातून सामाजिक प्रश्न मांडणेही गरजेचे असल्याने आम्ही अशा विषयाची निवड केली. दिग्दर्शक Milind Kamble सिनेमाबद्दल सांगतात की, चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला Adarsh Shinde यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना… अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत Sourabh Shetye व Anandi Joshi यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला Sourabh Shetye चा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं Avdhoot Gupte ने गायलं आहे. Abhijit Sakpal आणि मी ही गीते लिहिली आहेत.
चित्रपटात Aishwarya Rajesh, Swapnil Rajshekhar, Yash Kadam, Amol Redij, Archana Joshi, Rucha Apte, Gandhar Joshi, Prafulla Joshi, Prafulaa Ghag, Rajkiran Dali, Gopal Joshi, Sachin Surve, Nitin Jadhav, Puja Joshi, Vaidehi Patvardhan इ. कलाकरांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद Chetan Kinjalkar यांनी लिहिले आहेत. छायांकन Umesh Pofale तर संकलन Nakul Prasad– Prajyot Pawaskar यांचे आहे. संगीत Sourabh – Durgesh या संगीतकार जोडीने दिले आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0