Halal Honest Efforts – Amol Kagne
सिनेमा म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा आरसा. आपल्या समाजात होणाऱ्या अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी सिनेमातून आपण नेहमीच पाहतो. पण अशा गोष्टी आपल्या सिनेमातून साकारताना निर्माते आणि दिग्दर्शक यांना नेहमीच मोठे आव्हान पेलावे लागते आणि त्यातल्या त्यात निर्माता नवीन असेल तर प्रकरण जिकरीचे जाते. Amol Kagne या तरुण निर्मात्याने Amol Kagne Films या निर्मितीसंस्थेअंतर्गत Halal सारख्या धाडसी विषयावरच्या सिनेमाची निर्मिती केली आहे, आजपासून Halal संपूर्ण महाराष्ट्रात 110 सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
मुस्लीम समाजातील ट्रिपल तलाक या विषयावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन Shivaji Lotan Patil याने केले आहे. Halal बद्दल बोलतांना Amol सांगतो की, यापूर्वी मी काही नाटकांची निर्मिती केली आहे, निर्मितीसोबत अभिनय देखील मी करतो…फार पूर्वी Rajan Khan यांची Halal ही लघु कथा माझ्या वाचनात आली होती. पुढे एका हिंदी सिनेमाच्या दरम्यान Shivaji ने पुन्हा हा विषय मला ऐकवला आणि मी घरी विचारून त्यावर सिनेमा करण्याचे ठरवले. अनेकांनी मला सांगितले कि पहिलाच सिनेमा तू गंभीर विषयावर का करतो आहे? तेव्हा मी त्यांना सांगितले कि, सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजन नाहीये. मनोरंजनसोबत सामाजिक जाणीव जपून ते विषय मांडणे हा देखील एक चांगला मार्ग आहे. कारण सिनेमा हे एक प्रभावी माध्यम आहे.
सिनेमासाठी काय तयारी केली यावर Amol सांगतो कि, सिनेमा करण्याआधी अनेक मुस्लीम लोकांना भेटलो. अनेक महिलांना भेटलो, त्यांच्याकडून ट्रिपल तलाक विषयी जाणून घेतले. त्यांना होणारा त्रास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. मी आणि Shivaji अनेक मुसलमान कुटुंबांना भेटलो, त्यांचे बोलणे, वागणे, भाषा, कपडे याचा अभ्यास केला. शिवाय राजन खान यांनी देखील आम्हाला खूप मदत केली होती.
कलाकारांविषयी Amol सांगतो कि, सिनेमातील मुख्य नायिका अर्थात माझी बहिण हिची देखील सरळ निवड झाली नाही, भूमिकेसाठी तिला देखील Audition द्यावी लागली होती. Pritam ने सुद्धा भूमिकेसाठी खूप अभ्यास केला होता. Priyadarshan Jadhav आणि Chinmay Mandlekar हे दोघेही खूप उत्तम अभिनेते आहेत. भूमिकेची गरज त्यांना चांगली ठाऊक आहे. सिनेमा बघतांना तुमच्या लक्षात येईलच. सिनेमा तयार झाला, अनेक पुरस्कार मिळाले पण तरीही समाजातील काही घटकांकडून Halal ला विरोध झाला तेव्हा खूप वाईट वाटले. आपण प्रामाणिकपणे केलेल्या कलाकृतीला काही लोकांनी अशा प्रकारे React व्हावे अशी अपेक्षा नव्हती… पण आता मुख्यमंत्र्यांनी Halal ला सिनेमागृहात सुरक्षा देण्याचे कबुल केले आहे, त्यामुळे आम्ही आता थोडे सुखावलो आहोत.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0