या शॉर्ट फिल्म्स पाहायला विसरू नका!


Marathi short films you shouldn’t miss watching

सध्याच्या धावपळीत लोकांकडे इतका वेळ नाही की ते टीव्हीसमोर तासनतास बसू शकतात. त्याला पर्याय म्हणून त्यांच्या हातात स्मार्टफोन आला ज्यामुळे ते कुठेही आणि कधीही एंटरटेनमेंट मिळवू लागले. लोकांच्या या सवयी बदलत गेल्या, तसाच आपल्या चित्रपटसृष्टीतही बदल होत गेला. यामुळे युट्युबसारखा मंच तयार झाला आणि त्यातलाच एक भाग म्हणजे लघुपट. सध्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर शॉर्ट फिल्म्स. लघुपट आपल्याला कमी वेळात भरपूर काही सांगतात. म्हणूनच खाली दिलेल्या मराठी शॉर्ट फिल्म्स तुम्ही नक्कीच पहिल्या पाहिजेत.

१.केवडा-

Duration: 25:15 min Director: अमेय बेकनाळकर Cast: ज्योती सुभाष, आरोह वेलणकर.

‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, ‘स्मिता पाटील पुरस्कार’सारखे पारितोषिक पटकावलेला हा लघुपट हृदयाला भिडून जाणारा आहे. आजी आणि नातूमधले आगळे-वेगळे नाते, म्हातारपणातला एकटेपणा, आजीचे आपल्या नातूवर असलेले प्रेम व जिव्हाळा हे सगळे पाहून आपल्यालाही असे वाटते की प्रत्येकाला एक आजी असावी, आणि आपण ही असे तिच्याकडून आपले लाड करून घेतले पाहिजे. हा लघुपट पाहून प्रत्येकाला आपल्या आजीची आठवण नक्कीच येईल.

२.सेल्फी-

Duration: 07:05 min Director: रामचंद्र गावकर Star Cast: प्रल्हाद कुडतरकर.

या शॉर्ट फिल्मच्या नावातच खूप गांभीर्य लपलेलं आहे. नाव जरी सेल्फी असले तरी हा लघुपट मोबाईल किंवा सेल्फीबद्दल नसून ते स्वतःला एका नव्या पद्धतीने जाणून घेण्याबद्दल आहे. आपण दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या मतांवर स्वतःला कसे कमी लेखतो आणि स्वतःमधले चांगले गुण विसरतो हे अगदी सरळ, सोप्या शैलीने प्रत्येक सीनमध्ये मांडले आहे. लोकं बाह्य व्यक्तीमत्वावर आपल्याला कसे गृहीत धरतात याबद्दल ही फिल्म आपल्याला खूप काही शिकवून जाते. ह्या लघुपटानेही बरेच राष्ट्रीय पारितोषिक पटकावले आहे.

३. आई शपथ-

Duration: 15:01 min Cast: आर्यन दळवी, ऋजुता देशमुख, अभिजीत केळकर, मधुरा वेलणकर.

अंधश्रद्धासारख्या गोष्टी आजही आपल्या समाजातून काही निघाल्या नाही आहेत. एका लहान मुलाच्या मनावरही ते कसे परिणाम करते हे या लघुपटातून आपल्याला कळते. आपल्या भावाने त्याच्या आईची खोटी शपथ घेतल्यामुळे त्या मुलाच्या मनातली तळमळ व अस्वस्थता अगदी निरागसपणे दाखवली आहे. ऋजुता देशमुख, अभिजीत केळकर, मधुरा वेलणकर आणि आर्यन दळवी या कलाकारांनी या लघुपटात अप्रतिम भूमिका निभावली आहे.

४. अंतर –

Duration: 13:07 min Director: आनंदिता पळसुले, Cast: नेमिनाथ बोरगावे, गौतमी खटावकर, इशानी खटावकर, मृदुला खटावकर, रवींद्र खटावकर.

बालपण आणि त्याच्या आठवणी कशा हरवून गेल्या आहेत हे अंकिताच्या दृष्टीकोनातून आपल्याला या लघुपटात पाहायला मिळते. तसेच आजोबांची लाडकी असणारी आणि त्यांचाशी सर्व काही शेअर करणारी त्यांची नात आता मोठी झाली आहे. त्यांच्यातला दुरावा दोघांनाही जाणवू लागला आहे. अंकितासुद्धा तिच्या आजोबांशी मोकळी होऊन बोलू शकत नाहीये याची खंत तिला ही आहे. हे सर्व इतक्या सहजतेने प्रेक्षकांसमोर मांडले असल्याने आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
0
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

या शॉर्ट फिल्म्स पाहायला विसरू नका!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.