सगळ्यांना हवीहवीशी “सोबत”


New Marathi Movie “SOBAT” | 25th May

आयुष्यात प्रत्येकाला कोणाचीतरी साथ हवी असते. मग तो एखादा मित्र, प्रेयसी किंवा आपली आई ही असू शकते. ते चांगल्या आणि वाईट प्रसंगी नेहमी आपल्या पाठीशी असतील अशी आपण अपेक्षा करतो. असं वाटतं की, तो माणूस कायम आपल्या सोबत असला पाहिजे. त्याची साथ आपण कधीच न सोडण्याचं वचन देतो.

प्रेमाचे कितीतरी रंग आपल्याला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. बालपणातील प्रेम अगदी निरागस आणि कुठल्याही अपेक्षा न ठेवणारे असते. तसेच प्रौढ वयातलं प्रेम अगदी घट्ट आणि खरं असतं. कारण ते इतक्या वर्षांपासून जपून वाढवलेलं असतं आणि आता ते अखंड तसंच राहणार याची खात्री असते. त्याउलट जेव्हा तरुणपणात प्रेम होतं तेव्हा खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. येणाऱ्या अडथळ्यांमधून आपण किती आणि कसे सावरतोय ह्याची परीक्षा तो घेत असतो. अशाच तरुणपणातल्या प्रेमाला हळुवार स्पर्श करणारा कश्मिरा फिल्म प्रोडक्शनचा “सोबत” हा चित्रपट आपल्यासाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटात असलेला करण म्हणजेच हिमांशू विसाळे आणि गौरी म्हणजेच मोनालिसा बागल यांची प्रेमकहाणी सुरुवातीला कुठल्याही सामान्य तरुणाच्या आयुष्यातल्या प्रेमकथेसारखी मांडली आहे. पण अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे त्यांच्या गोड नात्याला गालबोट लागते आणि सगळंच विस्कटत. त्यांचं प्रेम समाजाला मान्य नाही हे आपल्याला कळते. करणवर गौरीचा बलात्कार केल्याचे खोटे आरोप घेतले जातात हे आपल्याला त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरवरून समजते. गौरी आणि करणचा समाजाला हरवण्याचा संघर्ष आपल्याला या चित्रपट दिसेल.

हिमांशू विसाळे याचा हा पहिला चित्रपट आहे. या आधी तो तायक्वांडो खेळ खेळत असे. त्यात त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. कश्मिरा विसाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच मिलिंद उके यांनी दिग्दर्शन केले आहे. सध्या ‘मराठी बिग-बॉस’मधून घरोघरी पोहोचलेल्या स्मिता गोंदकरसुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसतील. त्यासोबतच मोनालिसा बागल, रुचिरा जाधव, नागेश भोसले, प्रदीप वेलणकर, विजय गोखले, मनोज टाकणे, अभिलाषा पाटील, अश्विन पाटील, कौस्तुभ जोशी या कलाकारांचा समावेश आहे. २५ मे ला “सोबत” आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

सगळ्यांना हवीहवीशी “सोबत”

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.