Penguin Parade Article on Travelkari Medha…
रोजचं सकाळी उठणं, आवरणं, कामाला जायचं, रात्री घरी आणि मग झोप. या रोजच्या दिनक्रमामधून आपल्याला काही तरी वेगळ हवं असतं ते म्हणजे कुठे तरी एक किंवा ४-५ दिवसाची एखादी ट्रीप. ट्रीप म्हंटल की, आपला खूप काही प्लॅनिंग चालू होतं. पण काहीजणांना अगदीच नेहमी कुठे जाता येतं असं नाही. किंवा काहीना दुसऱ्यांची झालेली ट्रीप कशी झाली हे ऐकण्यात जास्त मज्जा वाटते. अशा प्रवास प्रेमींसाठी मेधा आलकरी यांची एक मस्त वेब सिरीज चालू झालीये जिचं नाव आहे ‘Travelkari Medha’.
या वेब सिरीजमध्ये मेधा आलकरी स्वतः तुम्हाला त्यांनी केलेल्या प्रवासाचं उत्तम वर्णन करून सांगणार आहेत. त्यांना फिरायची इतकी आवड आहे की, त्या स्वतः ७ खंड आणि जवळपास ६० देश फिरून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ट्रीपच्या आठवणींचा इतका मोठा आणि खूप सुंदर खजिना आहे. जो त्या या वेब सिरीजच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त आपल्या लॅपटॉपसमोर बसून बघायचं आहे. मेधा यांना जेवढी फिरायची आवड आहे त्याहून किती तरी जास्त केलेला प्रवास वर्णन करून सांगण्याची आवड आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या जगाची सफर करू शकता.
मेधा यांनी विविध वृत्तपत्रात लेखन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दूरदर्शनवरील विविध मुलाखतींमध्ये सूत्रसंचालन, श्रोत्यांशी संवाद असे कार्यक्रम केले आहेत. मुळातच मेधा यांना विविध स्थळांना भेट देऊन तिथल्या लोकांना भेटणे, त्यांची भाषा, चालीरीती समजून घेण्याचा छंद आहे. त्याच छंदामुळे त्यांना ते क्षण तितक्याच आल्हाददायकपणे प्रेक्षकांसमोर मांडता ही येतात आणि म्हणूनच त्यांची ही ‘Travelkari Medha’ वेब सिरीज खूप मस्त असणार आहे. आणि तुम्ही ती नक्कीच बघाल यात काही शंका नाही.
मग बघूया तर Travelkari Medhaची पहिली सफर आपल्याला कुठे घेऊन जाते ते…
Travelkari Medha | Episode 1 | Penguin Parade Phillips Island Australia | Travel Stories
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0