राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात..


Why Was Radhika Deshpande in Darga For Three Days???

मिळालेल्या भुमिकेचे सोने करणे ही चांगल्या कलाकाराची मोठी खुण. भूमिकेसाठी त्या पात्राचा सखोल अभ्यास केलेल्यांच्या अनेक गोष्टी आपण यापूर्वी पाहिल्या असणार परंतु पुण्याच्या Radhika Deshpande ने भूमिकेसाठी केलेला अभ्यास आज सगळीकडे चर्चेचा विषय ठरतो आहे. Aarti – The Unknown Love Story या सिनेमातीत Najnin या मुस्लीम मुलीच्या भूमिकेसाठी तिने सलग तीन दिवस मुंबईच्या एका दर्ग्यामध्ये घालवले. उद्देश हाच होता कि, दर्ग्यात येणाऱ्या मुस्लीम मुली आणि बायकांना जवळून पाहता यावे, त्यांचे वागणे, बोलणे, राहणीमान कळावे म्हणून तिने हा केलेला खटाटोप.

Why Was Radhika Deshpande in Darga For Three Days???

याबद्दल Radhika सांगते कि, “होणार सून मी ह्या घरची” मालिकेतल्या बबली आणि बिंदासपेक्षा खूपच निराळी अशी ही Najnin मुस्लीम मुलीची भूमिका होती. एका सह दिग्दर्शकाने माझं नाव सुचवल्याने मला ही भूमिका मिळाली. Najnin  नावाच्या मुलीची भूमिका मी साकारली आहे. जिच्या अब्बुला बरं नाहीये म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये Aarti शेजारी भरती केलं आहे. Najnin ची देखील एक गोष्ट आहे जी बोलण्यातून ती व्यक्त करते. Najnin ने आजवर खूप सोसलं आहे, घरची परिस्थिती जेमतेमच आहे, त्यात देखील ती खंबीरपणे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा सामना करते. तिच्या बुरख्याआड अनेक दु:खं दडली आहेत. मुस्लीम बायका आणि मुली कशा असतात, कशा वागतात, कशा बोलतात यासाठीच मी मुंबईच्या एका दर्ग्यात सलग तीन दिवस जात होती. बाहेर नमाज पढणाऱ्या मुलींशी मी मैत्री केली आणि मग मला त्यांच्यात एक नाजनीन सापडली असं बोलतांना Radhika भावूक झाली.

Why Was Radhika Deshpande in Darga For Three Days???

Radhika पुढे सांगते कि, Aarti सिनेमात Aarti हिची गोष्ट जरी मुख्य असली तरी माझ्या वाट्याला आलेले Najnin चे सीन्स प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतील असा माझा विश्वास आहे. दर्ग्यातला एका मुलीसोबत मी बाहेर लोकल ट्रेनचा प्रवास देखील केला. तिच्याशी जवळीक झाल्यावर मला ती कुठे आणि कशी राहते, काय खाते, कशी बोलते, कपडे कोणते घालते, कसे घालते एवढंच नाही तर तिच्या शरीराला येणारा अत्तराचा सुगंध देखील मला अनेक गोष्टी शिकवून गेला. त्यामुळेच मी माझ्या आवाजात देखील बदल केला आहे. सिनेमात Najnin चा आवाज तुम्हाला Radhika चा वाटणार नाही एवढंच मी सांगेल. तिच्या कपड्यांचा रंग हा देखील मला तिथेच मिळाला आहे.

Why Was Radhika Deshpande in Darga For Three Days???

सर्वात महत्वाचं म्हणजे आरती या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका Sarika Mahesh Mene या देखील एक स्त्री असल्याने त्यांना हवं ते मला देता आलं. त्यांनी देखील मला खूप सहकार्य केलं. अशा प्रकारचा अभ्यास करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, कारण मला दर्ग्यात एक मुस्लीम मुलगी म्हणूनच जायचं होतं. आयुष्यभर विसरणार नाही असा तो अनुभव होता. सिनेमातील पाच सीन मधून दिसून येणारी Najnin मी माझ्या पद्धतीने चोख साकारली आहे, आता प्रेक्षकांना माझा हा प्रयत्न किती आवडतो ते सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल. पण यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या प्रत्येक कलाकाराला नेहमीच प्रेरणादायी ठरत असतात.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.