रायगडाचा होणार सर्वांगीण विकास…


Raigad’s Development Authority Announce…

रायगड विकास प्राधिकरणाची घोषणा…

आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात श्री शिव राजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडच्या (समिती) वतीने “रायगड विकास प्राधिकरण” (प्राधिकरण) हा विषय घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार होते व प्रमुख अतिथी म्हणून प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती होते. शिवाय, महाराष्ट्रभरातील गडकिल्ले आणि इतिहास विषयाशी संलग्न कार्य करणाऱ्या १५० हून अधिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राधिकरणाची व त्याच्या प्रस्तावित कार्याची ओळख महाराष्ट्राच्या जनतेला व्हावी व रायगड संवर्धन कार्याबद्दल लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा उद्देशाने समितीने सदर पत्रकार परिषद आयोजित केली होती.

Raigad's Development Authority Announce...

यावेळी उपस्थित पत्रकारांना आणि निरनिराळ्या संस्थेच्या प्रतिनिधींना खासदार संभाजीराजे यांनी संबोधित करून प्राधिकरणाची ओळख, रूपरेषा आणि कार्यकक्षा यांची माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या कार्यात इतिहास आणि गडकिल्ले विषयक अनेक तज्ञ मंडळी, पुरातत्व विभागाचे तज्ञ तसेच जागतिक पातळीवर कार्य केलेले देशी-विदेशी तज्ञ यांचा समावेश असणार आहे. या कार्यात त्यांनी सर्व शिवप्रेमी व इतिहासप्रेमी कार्यकर्ते व जनसामान्यांच्या सुयोग्य सूचनांचे स्वागत आणि विचार होईल, अशी ग्वाही प्राधिकरणाच्या दिली. रायगड पायथ्याला पाचाड येथे एक शिवश्रुष्टी उभारून ध्वनीप्रकाश योजना करून नित्य इतिहास कथन करणार  असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.

Raigad's Development Authority Announce...

या प्रसंगी बोलताना आयोजक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी आवाहन केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या साथीने स्वराज्य उभारण्याचे महत्कार्य केले. मुघल व इंग्रजांनी राजधानी सहित अनेक गडकिल्ले उध्वस्त केले. आज रायगड विकास प्राधिकरणाच्या निमित्ताने महाराजांचे वंशज असलेल्या माननीय खासदार युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते रायगडचे संवर्धन आणि विकास होणार आहे, ही फार गर्वाची बाब आहे. रयतेने छत्रपती शिवरायांना  साथ दिली तशी साथ आपण सर्वांनी प्राधिकरणाच्या पाठीशी उभे राहून रायगडाला सोन्याचे दिवस पुन्हा आणावे. मराठी माणसाने चांगल्या कामात आडकाठी आणण्याची वृत्ती सोडून, आपसातले मतभेद बाजूला ठेवून खासदार युवराजांच्या मागे एकजुटीने उभे रहावे.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

रायगडाचा होणार सर्वांगीण विकास…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.