राजेश शृंगारपुरे यांनी दिली कॅफे मराठीला भेट!


Rajesh Shrungarpure Visits Café Marathi

सध्या सर्वत्र चर्चेत असलेला शो म्हणजेच मराठी बिग बॉस. त्याला अजून मीठ मसाला लावून भरपूर कंटेन्ट देणारे म्हणजे त्यातले १५ स्पर्धक. त्यातीलच एक चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजेच राजेश शृंगारपुरे. राजेश शृंगारपुरे हे आता मीडिया मध्ये चर्चेचा विषय झाले आहेत. बिग बॉस मध्ये काढलेले दिवस त्यांच्यासाठी खूप कठीण ठरले होते. बाहेर पडल्या नंतर त्यांना बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या आयुष्यात सध्या खूप गडबड झाली असताना त्यांचा नवीन चित्रपट गडबड झाली येत्या १ जून ला प्रदर्शित होत आहे.

याच चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी नेहा गद्रे, चित्रपटाचे दिग्दर्शक संतराम आणि संगीतकार रमेश रोशन सोबत कॅफे मराठी मध्ये पदार्पण केले. कॅफे मराठीच्या गावभर चर्चा या शोमध्ये त्यांच्यासोबत खूप गप्पा-गोष्टी रंगल्या. स्वभावाने ते मनमिळाऊ असल्यामुळे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी प्रामाणिकपणे दिले. फिल्म मधली त्यांची भूमिका किती वेगळी आहे हे राजेश यांनी कॅफे मराठीला सांगितले. नेहा गद्रे यांनी त्यात सरदार ची भूमिका केली आहे तर राजेश आणि विकास पाटील यांनी चक्क बाईचे वेष धारण केले आहे. या सोबतच त्यांनी सेट वर घडलेल्या गमतीजमती सुद्धा सांगितल्या. फिल्म मधली दोन गाणी राजेश वर चित्रित केली आहेत. इष्काचा खेळू डाव रे हे गाणं त्यांनी कुल्लू मनालीला जाऊन शूट केले होते आणि त्याचा अनुभव कसा होता हे दिग्दर्शक संतराम यांनी शेअर केले. राजेश शृंगारपुरे यांनी झेंडा सारख्या बऱ्याच गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे. तसेच त्यांनी सरकार राज, मर्डर ३, डॅडी सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सुधा काम केले आहे.

बिग बॉस मधून बाहेर पडल्या नंतर ते पहिल्यांदाच मिडिया समोर येणार होते तरी त्याचे दडपण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसून आले नाही. त्यांनी गावभर चर्चेचा हा भाग आपली विनोदी बाजू दाखवून खूप जास्त खुलवला असे कॅफे मराठीला सांगायला आवडेल. अशाप्रकारे त्यांना सुद्धा कॅफे मराठी सोबत गप्पा मारताना खूप मज्जा आली. त्यांना येणाऱ्या चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

What's Your Reaction?

Cute Cute
0
Cute
Lol Lol
1
Lol
Hot Hot
0
Hot
WOW WOW
0
WOW
WTF WTF
0
WTF

Comments 0

Leave a Reply

राजेश शृंगारपुरे यांनी दिली कॅफे मराठीला भेट!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.