…म्हणे आर्ची परत येतेय…


Aarchi is Coming Back…
सध्याच्या घडीला सिनेमात म्हणा किंवा मालिकेमध्ये म्हणा नवीन नवीन चेहरे दिसतात. एका सिनेमा किंवा एका मालिकेमधून त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते की प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर त्या Character च्या नावाने ओळखू लागतात. तसंच काहीसं Rinku Rajguru च्या बाबतीत झालं आहे. नाही ना चटकन लक्षात आलं Rinku Rajguru… अहो म्हणजे आपली आर्ची हो…  Sairat नंतर Akash Thosar आपल्याला Mahesh Manjrekar यांच्या F.U या सिनेमामध्ये दिसला. आर्ची देखील आपल्याला परत रुपेरी पडद्यावर दिसली पुन्हा एकदा Sairat मध्येच Sairat सिनेमाचा South Remake करण्यात आला होता त्यामध्ये Rinku Rajguru नेच आर्ची ची भूमिका केली होती. पण आता आर्ची काय करतेय हे जाणून घेण्यास तुम्ही नक्कीच उत्सुक असणार… हो… ना… चला तर मग बघूया काय करतेय आर्ची… दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक आनंदाची बातमी CafeMarathi तुम्हाला देणार आहे.
Rinku Rajguru नं Sairat या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. Sairat ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची… आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. Rinku Rajguru लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Ringan या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक Makrand Mane याच्या नव्या चित्रपटात Rinku महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. उदाहरणार्थ निर्मित या निर्मितीसंस्थेचे Sudhir Kolte आणि Vikas Hande या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सुधीर कोलते यांनी यापुर्वी Chidiya या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.
Makrand आणि Rinku या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच Makrand आणि Rinku दोघंही अकलूजचे आहेत. Makrand चा Ringan हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेला आहे.
चित्रपटाविषयी माहिती देताना Makrand सांगतो कि, ‘चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो. रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तत्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.’
‘Makrand चा Ringan हा चित्रपट आम्ही पाहिला होता. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. त्याला चित्रपट हे माध्यम नेमकं माहीत आहे. त्यामुळे त्यानं या चित्रपटाचं कथानक ऐकवल्यावर आम्हाला ते आवडलं. आजुबाजूला घडणारं वातावरण संवेदनशील पद्धतीनं या चित्रपटात मांडलं जाणार आहे,’ असं निर्माते Sudhir Kolte यांनी सांगितलं.
Sairat नंतर आर्ची या सिनेमात कोणती भूमिका करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे, तो पर्यंत आपल्याला पुढच्या बातमीची वाट पाहावी लागणार आहे.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

…म्हणे आर्ची परत येतेय…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.