Shentimental | Movie Review 3/5


Shentimental : 1 Time Watch

Shentimental पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांचंही एक “Shenti” असं कारण आहे ! ते म्हणजे Ashok Saraf ! त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतला मोठा अभिनेता म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. पण Ashok Saraf यांच्याबद्दलचा Soft Corner बाजूला ठेऊन Shentimental पाहिला तरच आपल्याला चित्रपटाची खरी परिस्थिती समजते. चित्रपटामध्ये Ashok Saraf, Upendra Limaye, Vikas Patil यांनी अनुक्रमे प्रल्हाद घोडके, दिलीप ठाकूर आणि सुभाष जाधव या मुख्य पात्रांची भूमिका बजावली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन Poster Boys, Poster Girl सारखे Hit चित्रपट देणाऱ्या Sameer Patil यांनी केलं आहे.   

चित्रपट अंधेरी पोलीस ठाण्याचा संदर्भ देऊन गोष्ट सांगायला सुरुवात करतो. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद घोडके (Ashok Saraf) हे अगदी आपल्या कामात तत्पर असणारे अधिकारी दाखवले गेलेत. अर्थात जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी प्रेक्षकांना हसवलंच आहे. पण एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी “वरून” आलेल्या दबावामुळे प्रल्हाद घोडके, दिलीप ठाकूर आणि सुभाष जाधव सर्वांना बिहार ला चोर मनोज पांडे (Suyog Gorhe) याच्या घरी जावं लागतं. मग सरू होतो त्यांचा तपासाचा प्रवास !

संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला बऱ्याच अशा जागा आहेत जिकडे चोर मनोज पांडेशी पोलीस माणुसकीने वागताना दिसतात. त्याच नात्याने थोडीशी सुट देताना दिसतात. एकंदरीत “Shenti” होताना दिसतात. आता या सर्व अधिकाऱ्यांचा तपास पूर्ण होतो की नाही हे, पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहायला जावं लागेल.

चित्रपटाच्या Lead Roles नी त्यांचे काम हे चोख बजावलेले आहे. पण नेमकं प्रेक्षकांना चित्रपटातून काय सांगायचंय यात मात्र जरा घोळ झालेला आपल्याला दिसतो. दिग्दर्शक म्हणून Sameer Patil यात थोडेसे भरकटल्याचे दिसतात. प्रल्हाद घोडके (Ashok Saraf) पोलिसांचीमेंटल‘ टेस्ट घेण्याऐवजी त्यांच्याकडे शेंटिमेंटल होऊन पाहा”, असा संदेश देतात. या वाक्याचा प्रभाव प्रेक्षकांवर पडेल असं संपूर्ण चित्रपटामध्ये काही घडताना दिसतच नाही. पोलिसांच्या समस्यांवरही जास्त खोल भाष्य करताना हा चित्रपट दिसत नाही, कदाचित दिग्दर्शक Sameer Patil यांना त्याची गरज वाटली नसावी.

एकंदरीत चित्रपटात बरंच काही अजून करता आलं असतं. Mohalla गाणं त्यातल्या त्यात थिरकायला लावतं. Ashok Saraf यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहून नक्कीच आवडेल. त्यामुळे हा चित्रपट One Time Watch तरी आहेच !

 CafeMarathi कडून “Shenti” न होता Shentimental ला तीन टाळ्या??????!!!

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Shentimental | Movie Review 3/5

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.