Some Remarkable Marathi Novels Must Read
मे चा महिना आता संपायलाच आला आहे आणि जूनचा महिना सुरु होणार आहे. म्हणजे सर्वांना पावसाची ओढ लागली आहे. पावसाच्या थंडगार वातावरणात आपल्याला बालकनी मध्ये बसून गरमा-गरम भजी सोबत कॉफी घेऊन पावसाची मज्जा घ्यायला आवडते. पावसाळ्यात आपल्याला फारसं बाहेर जाता येत नाही. अशा वेळी तुम्हाला शांत बसून काही वाचण्याची इच्छा होत असेल तर खाली काही उल्लेख केलेल्या मराठी कादंबऱ्या आणि पुस्तके तुम्ही नक्की वाचल्या पाहिजेत.
माझा प्रवास – विष्णूभट गोडसे एक भारतीय प्रवासी आणि मराठी लेखक होते. या पुस्तकात त्यांनी १८५७-१९५८ पेण मधील वारसाई या गावापासून भारतातल्या वेग वेगळ्या जागेंवर केलेल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. सोबतच त्यांनी सन १८५७ मध्ये घडलेल्या बंदाची कहाणी रुचकर पद्धतीने सांगितली आहे. त्यासोबतच त्यांनी राणी लक्ष्मीबाई साठी सुद्धा काम केले होते आणि झासीचा पराभव प्रत्यक्ष पहिले होते. हि कादंबरी सन १९०७ मध्ये प्रकाशित झाली होती.
कोसला – भालचंद्र नेमाने लिखित हि कादंबरी १९६३ साली प्रकाशित झाली होती. या कादंबरीचे प्रमुख पात्र पांडुरंग सांगवीकर यांच्या दृष्टीकोनातून या कादंबरी मधील कथा मांडली गेली आहे. सांगवीकरांची ग्रामीण भागातली भाषा या कादंबरीला वेगळे ठरवते. यातील असलेल्या डायरीचे कथन जरी निराशादायी असले तरी नेमाने यांनी ते हलक्या विनोदी पद्धतीने लिहिले आहे. या कादंबरीचे इंग्रजी सोबतच गुजराती, बंगाली, उर्दू, पंजाबी, असामी भाषेत सुद्धा भाषांतर केले होते.
ययाती – १९७८ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी कदाचित महाभारत मधील सर्वात मनोरंजक आणि आकर्षक भागांपैकी एक आहे . विष्णूभट खांडेकर यांनी लिहिलेली ही कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली होती. ययाती हे एक उदात्त सशक आणि महान विद्वान होते. त्यांना देवयानी सारखी एक सुंदर पत्नी लाभली असून ते तिची दासी शर्मिष्ठाच्या प्रेमात पडतात आणि असे म्हणतात कि त्यांचे शरीराचे सुख अजून असमाधानी राहिले आहे. त्यासाठी ते आपल्या मुलाची तरुणाई आणि स्वतःच वृद्धापकाळ याची अदला -बदल करतात.
जेव्हा मी जात चोरली होती – हे पुस्तक बाबुराव बागुल यांनी लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये आयुष्यात माणसाला होणाऱ्या वेगवेगळ्या दुःखाचे , संतापाचे वर्णन केले आहे. यात त्यांनी एका क्रूड समाजाचे तापट चित्रण केले आहे. या पुस्तकातला प्रत्येक पात्र कुठल्या ना कुठल्या तरी खिन्नतेचा सामना करत आहे. कोणी सूड घेण्याचं पाप करत आहे तर कोणी स्वतःच्या जीवाला वेशीवर टांगले आहे. मराठी मध्ये आधुनिक साहित्य लिहिणारे बाबुराव पहिले लेखक होते. हे पुस्तक सन १९६३ मध्ये प्रकाशित झाले होती.
मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.
Comments 0