लोकुम- टर्किश प्रजेची लाडकी मिठाई


Turkish Delight – daily feast for Turks
इस्तंबूलमधील स्पाईस बाजार खूपच नाविन्यपूर्ण वाटला. आत शिरताच मसाल्याच्या वासाने शिंका आल्या तरी स्वादुग्रंथी आपोआप स्रवायला लागल्या. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पाहायला (खरंतर हुंगायला) मिळाले. आंबेपोळी फणसपोळी सारखी तिथे जर्दाळू व मलबेरी पोळी होती. “लोकूम” नावाची माहीम हलवा ह्याची बहीण म्हणावी अशी एक मिठाई खाल्ली. मिठाईपेक्षा त्यामागची कहाणी जास्त आवडली.

लोकुमचा जन्मदाता अली मोहिद्दीन गावाकडून नशीब काढायला म्हणून इस्तंबूलला आला. अठराव्या शतकाच्या सरतेची ही वर्ष. सुलतानाच्या साम्राज्यात तेव्हा लक्ष्मी पाणी भरत होती. लिमलेटच्या गोळ्यांसारख्या कडक कॅंडीज बनवण्यात मोहिद्दीनचं मन रमेना. काहीतरी नवीन स्वादिष्ट बनवावं असा ध्यास त्याला लागला. थोडीशी नरम, चावा-गिळायला सोपी अशी वडी बनवावी म्हणून त्याचे अविरत प्रयत्न चालू होते. त्यातून जन्मली ही लोकूम- टर्किश डिलाईट.

“राहत लोकूम” असं गोंडस नाव देऊन त्यानं त्या वड्या सुलतानाकडे भेटस्वरूप पाठवल्या. सुलतानाला बेहद आवडलेली ही लोकूम मग साऱ्या प्रजेची लाडकी बनली. अली मोहिद्दीनच्या पुढच्या पिढ्यांनी तिला नारिंगी, गुलाब, मधु असे वेगवेगळे स्वाद दिले, नवनवे रंग दिले. काहींना दिलं खोबऱ्याचं आवरण काहींना सुक्या मेव्याचं सारण. लोकूम अधिक आकर्षक बनत गेलं. आजही ते टर्किश प्रजेत अतिशय प्रिय आहे. दुकानात रकानेच्या रकाने ह्या ‘लोकूम’ने भरलेले आढळतात. परदेशी राहणाऱ्या टर्किश माणसाला लोकूमची वडी मिळाली तर त्याला होणाऱ्या आनंदाची तुलना परदेशस्थ मुंबईकराला हापूसचा आंबा खायला मिळाल्यावर होणाऱ्या आनंदशीच होऊ शकते.

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

लोकुम- टर्किश प्रजेची लाडकी मिठाई

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.