Utarand | उतरंड (Emotional Marathi Short Film on Innocence and Dreams)


Director & Music by: Ganesh-Suresh Producer: Sanjay Golapkar  Associate Producer: Sanjay Khandelwal, Ganesh-Suresh

Utarand ‘ एका निरागस प्रेमाची गोष्ट…

एक लहान मुलगा आणि बक्षीसरूपी मिळालेलं रोपटं यांच्यातील उमलुन येणारे हळुवार प्रेम आणि जवळीक यांच्यावर निरागसपणे भाष्य करणारा लघुपट म्हणजे Utarand. आज आपण “झाडे लावा, झाडे जगवा” असा उपदेश करताना अनेकांना बघतो. पण आजही भारतात कित्येक आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाह वृक्षतोडीवर अवलंबून आहे. त्यांनी जर हा व्यवसाय सोडला तर त्यांनी पोटाला खायचं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर फोडणी म्हणजे मोठमोठ्या नामांकित उद्योजकांनी डोंगर-दऱ्यात वृक्षतोड करून सुरू केलेल्या कंपन्या, उद्योग आणि या सगळ्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम.

utarand5अशा सगळ्या वातावरणात एका लहान मुलाचा रोपट्याला वाचवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष. हे पाहून मनाची घालमेल होते. या Shot Film चे संपूर्ण चिञीकरण लोणावळ्यातील ठाकरवाडी या आदिवासी वस्तीत झाले आहे. या Short Film साठी संगीत हे ‘Ganesh-Suresh’ यांनी दिले असुन आपल्या बहारदार सुरांची जादूही दाखवली आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन, बहारदार संगीत आणि नेत्रसुख देणारे चित्रीकरण अशा विविध अंगानी Utarand नटलेला आहे. Lonavala मधील Architect Sanjay Golapkar यांनी एक निर्माता म्हणुन प्रथमच या लघुपटामार्फत चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे.

utarand2

तसेच सहनिर्माता म्हणुन Sanjay Khandelwal आणि Ganesh-Suresh यांनी आपल्या भुमिका पार पाडल्या आहेत. या लघुपटाचे DOP, Editing & Graphics Akshay Shinde यांनी केले आहे. तसेच Nikhil Arjune, Avnish Shrivastva, Mahesh Shevale, Manish Sarjekar, Haidar Ali यांनी तांत्रिक विभागात आपल्या महत्त्वाच्या भुमिका चोखपणे बजावल्या आहेत. या लघुपटात Ramesh, Anil Mandavade,  Asaram Aatole व लोणावळ्यातील इतर स्थानिक कलाकारांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. प्रेक्षकांसाटी हा लघुपट एक आगळी वेगळी पर्वणी ठरेल असे मत दिग्दर्शकांनी मांडले आहे.

Film चा विषय कसा सुचला?

आम्ही काही मित्र गावाशेजारील डोंगरावर फिरायला गेलो होतो. त्यावेळी काही जण तेथे वृक्षलागवड करताना दिसले. रविवारची सुट्टी असल्याने आम्हीही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही सगळे त्या कामात मग्न झालो. काही वेळानंतर तेथून कातकरी महिला डोक्यावर लाकडांचा मोठमोठया  मोळ्या घेऊन जाताना दिसल्या आणि या विरोधाभासातून आम्हांला हा विषय सुचला.

विषयासाठी research केला होता का ?

हो. आम्ही त्या कातकरी वस्तीत ७-८ दिवस जाऊन त्या विषयाचा अभ्यास केला. शेवटी आमच्या असे निदर्शनास आले कि, या जमातीचे पोट वृक्षतोडीवरच अवलंबून आहे.

या short film मुळे हा विषय कुठवर पोहचला?

जास्त लांब नाही पण आता पर्यंत दोन ठिकाणी screening झाली. ती म्हणजे पुणे आणि गोवा येथे.

Shooting चा Experience कसा होता?

भारी, पण काही खूप विचित्र प्रसंग घडले.आम्हाला तीन Night shoot cancel करावे लागले. कारण तेथील पुरूष आणि महिला रात्री दारू पिऊन तराट असायच्या आणि त्यामुळे shooting करणे शक्य होत नव्हतं. एकंदरीत मज्जा आली कारण आमची टिम खूप मेहनती आणि strong होती.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Utarand | उतरंड (Emotional Marathi Short Film on Innocence and Dreams)

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.