आजपासून नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2018…


 Nashik International Film Festival started…

दरवर्षीप्रमाणे यंदाही मेट्रो फाउंडेशन ऑफ इंडिया आणि कलावैभव संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने सलग दहाव्या वर्षी नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. मुकेश कणेरी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा महोत्सव कार्निवल स्वरुपात २२ ते २५ मार्च होणार असून या महोत्सवा अंतर्गत विविध कार्यक्रम रावसाहेब थोरात ऑडीटोरीअम, हॉटेल बीएलव्हिडी येथे रंगणार आहेत.

निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्म्रिती विश्वास यांना जाहीर करण्यात आला असून मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक अभिनेत्री सुषमा शिरोमणी आणि मराठी सिनेमा जगभर पोहचवणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्कार जाहीर झाले असून उद्घाटन समारंभावेळी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

निफ २०१८ मध्ये १२ प्रदर्शित न झालेले मराठी चित्रपट, ७० शॉर्ट फिल्म्स, ७ डॉक्युमेन्टरीज, ७ भारतीय व भारताबाहेरील प्रादेशिक भाषेतील चित्रपट तसेच राष्ट्रीय फिल्म अर्कीव्ह्जचे ५ चित्रपटांचे विशेष पॅकेज दाखविले जाणार असून ग्रामीण विषयावरील चित्रपटांसह १५० हून अधिक चित्रपटांना वाव मिळणार आहे. यापैकी एबीसी, पेज ४, कॉपी, माझं भिरभिर, मोर्चा, टपरा टॉकीज यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रादेशिक भाषेतील चित्रपट, माहितीपट यावेळी दाखवले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी www.niffindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच नोंदणीसाठी www.bookmyshow.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी गुरुवार दि. २२ मार्च रोजी होणार कार्यक्रम
 जागतिक जलदिनानिमित्त संदीप सावंत दिग्दर्शित ‘नदी वाहते’ चित्रपटाचे प्रदर्शन
 निफ २०१८ जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री स्म्रिती विश्वास यांना जाहीर
 वर्षा उसगावकर, सुषमा शिरोमणी आणि गजेंद्र अहिरे यांना निफ सन्मान पुरस्कार
 ‘मराठी चित्रपटांचे अच्छे दिन’ या विषयावर चर्चासत्र

अधिक माहितीसाठी संपर्क
मुकेश कणेरी
फेस्टिवल डिरेक्टर – निफ २०१८
९९७०३६४४४६, [email protected]

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.


Like it? Share with your friends!

0

Comments 0

Leave a Reply

आजपासून नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2018…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.