अनोखी प्रेम गाथा : झरी 


Zari Marathi Upcoming Movie…
९ जून पासून प्रदर्शित…
आपण सर्व वर्तमानपत्र का वाचतो? जगात आणि आपल्या अवतीभोवती काय चाललंय याची माहिती मिळावी म्हणून. परंतु वर्तमानपत्राने एखाद्या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले तर आपण काय करतो, फार तर आपण सोशल मीडियावर अभिप्राय नोंदवून मोकळे होतो. पण काही संवेदनशील लोकांसाठी तो एक सिनेमाचा विषय होऊ शकतो. डिसेंबर 2014 मध्ये वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. कुमारी मातांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी ती बातमी होती. ती वाचून एक व्यक्ती प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने यावर सिनेमा करायचे ठरवले. त्या लेखक दिग्दर्शकाचे नाव आहे Raju Meshram आणि सिनेमा आहे Zari (झरी). विषयाची अधिक माहिती मिळावी म्हणून त्यांनी अनेक महिने यवतमाळ, चंद्रपूरच्या जंगलाजवळ मुक्काम केला. इतकेच नव्हे तर सर्व चित्रीकरण देखील नक्षलवादी भागात केले.
यापूर्वी त्यांच्या आलेल्या खैरलांजीच्या माथ्यावर या सिनेमातून वास्तवाचे निखारे त्यांनी चितारले होते. झरीच्या विषयाचे अनेक पदर उलगडण्यासाठी त्यांनी चंद्रपूर आणि यवतमाळच्या जंगलात जाऊन तिथे राहणाऱ्या लोकांचे जीवनमान समजावून घेऊन Zari (झरी) सिनेमाची कथा गुंफली. यासाठी त्यांना अकोल्याचे माजी आमदार Tukaram Bidkar तुकाराम बिडकर यांनी निर्माता आणि अभिनेता म्हणून मोलाची साथ दिली. सिनेमात Zari (झरी)ची शीर्षक भूमिका Namrata Gaikwad हिने साकारली आहे. तर Nisha Parulekar, Milind Shinde, Nagesh Bhosale, Aniket Kelkar, Tukaram Bidkar, Anant Jog, Kamlesh Sawant, Dr. Sandeep Patil, Vijay Dive, Ravi Uchgoankar, Ashok Shirole यांच्या विशेष भूमिका आहेत.
आपण आज सर्व Internet 4G च्या युगात आहोत, परंतु एक महाराष्ट्र असा देखील आहे जिथे त्यांना एकवेळ खाण्यासाठी देखील युध्द करावे लागते आहे. त्या एकवेळच्या जेवणासाठी जीवनाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. Zari (झरी) सिनेमा अशा अनेक गोष्टींना दाखवत त्यांच्या सामाजिक, भावनिक आयुष्याचा वेध घेतो. तिथले सामान्य जनजीवन आणि नक्षलवाद यांचा सहसंबंध लेखक दिग्दर्शक Raju Meshram यांनी दाखवला आहे. सिनेमाचे कथानक हे Zari (झरी) या पात्राभोवती गुंफण्यात आले आहे. Zari (झरी) ही एका कुमारी माताची प्रेम गाथा आहे. सिनेमाला Pravin Kuwar यांचे संगीत लाभले असून हा सिनेमा 9th June रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. Mrs. Radha Bidkar आणि Kundan Dhake यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
शिवाय चित्रपटात वऱ्हाडी, तेलुगू आणि छत्तीसगढी अशा तीन भाषांचा संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला इंग्रजी उपशीर्षकेही देण्यात येणार आहेत. चित्रपटात पाहायला मिळणाऱ्या या तीन भाषांसाठी त्या त्या भाषेतील तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्यात आली आहे. चित्रपटात वेगवेगळ्या राज्यांतून आलेली माणसे आणि त्यांचे संवाद दाखविण्यात आले असून ती माणसे त्यांच्याच भाषेत बोलताना दिसावी, म्हणून हा प्रयोग करण्यात आल्याचे लेखक दिग्दर्शक Raju Meshram यांनी सांगितले. शिवाय सर्व वर्तमानपत्र अर्थात सर्व प्रसारमाध्यमांचे त्यांनी आभार मानले आहेत.

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

अनोखी प्रेम गाथा : झरी 

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.